Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Stock: सोयाबीनचा शिल्लक साठा २३ टक्के कमी राहणार

Soybean Processors Association of India: येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सोयाबीनच्या नवीन हंगामात शिल्लक साठा ६.८६ लाख टन राहण्याचा अंदाज आहे. चालू हंगामातील ८.९४ लाख टन शिल्लक साठ्याच्या तुलनेत तो तब्बल २३ टक्के कमी आहे.

Anil Jadhao 

Pune News: येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सोयाबीनच्या नवीन हंगामात शिल्लक साठा ६.८६ लाख टन राहण्याचा अंदाज आहे. चालू हंगामातील ८.९४ लाख टन शिल्लक साठ्याच्या तुलनेत तो तब्बल २३ टक्के कमी आहे, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) म्हटले आहे.

देशातील सोयाबीन उत्पादन खरीप २०२४ मध्ये वाढले होते. मात्र गेल्या हंगामातील कमी शिल्लक साठा आणि नगण्य आयात यामुळे सोयाबीनचा पुरवठा कमी आहे. सोपाने जुलैचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यात देशातील मागणी आणि पुरवठा, आयात आणि निर्यात तसेच सोयापेंड निर्मिती, वापर आणि निर्यातीची माहिती दिली. देशात यंदा सोयाबीनचे जवळपास १२६ लाख टन उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी ११९ लाख टन उत्पादन होते.

यंदा सोयाबीनची आयातही कमीच राहिली. गेल्या हंगामात ६.२५ लाख टन आयात झाली होती. चालू हंगामात आतापर्यंत २५ हजार टनांचीच आयात झाली. त्यामुळेही देशातील एकूण पुरवठा कमी राहिला. लागवडीसाठी बियाणे सोडून हंगामात गाळपासाठी १२२ लाख टन सोयाबीन उपलब्ध झाले.

जूनच्या शेवटपर्यंत देशातील बाजारात ८९ लाख टन सोयाबीनची आवक झाली. गेल्या हंगामात जून २०२४ पर्यंत ९८ लाख टन आवक होती. तर गाळप ८७ लाख टन झाले, गेल्या वर्षीपेक्षा गाळप ८ लाख टन कमी आहे, असेही सोपाने स्पष्ट केले.

निर्यात कमीच

ऑक्टोबर-जून या कालावधीत पशुखाद्य क्षेत्राकडून ४६.५० लाख टन सोयापेंडचा वापर झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो चार लाख टनांनी कमी राहिला. सोयापेंड निर्यात सुमारे दोन लाख टनांनी घटून १५.६० लाख टनांवर आली. गेल्या वर्षी ती १७.७७ लाख टन होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Fake Seeds: अहिल्यानगरमध्ये बोगस कपाशी बियाण्यांचा गैरप्रकार; शेतकऱ्यांचे नुकसान, शासनाचे कडक कारवाईचे आश्वासन

Kharif Sowing : मराठवाड्यात ४५ लाख ७० हजार हेक्टरवर पेरणी

Mangrove Conservation : कांदळवन संवर्धनातून साकारतेय हरित अर्थव्यवस्था

Improved Crop Variety : महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे विकसित पिकांचे सुधारित वाण

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ नव्हे, हा तर स्वार्थपीठ महामार्ग : राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT