डॉ. योगेश इंगळे, डॉ. दिनेश पैठणकर, गिरीश भांगे सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत, तर मृग बहराची फळे वाटाण्याच्या आकाराची आहेत. ही फळे झाडावर टिकून राहून योग्य प्रकारे वाढल्यास त्यांचे अंतिम उत्पादनामध्ये रूपांतर होते. त्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत केलेली लागवड, झाडातील संजीवकांचा फळाच्या शेवटच्या टोकापर्यंत होणारा पुरवठा, कर्ब-नत्र यांचे संतुलन, संतुलित पोषण या सारख्या उपाययोजनांवर भर देण्याची आवश्यकता असते. .मात्र या पावसाळ्यामध्ये सातत्याने पडत असलेला पाऊस, पाणी साचून संपृक्त झालेली जमिनी यामुळे पिकांच्या मुळांना अन्नद्रव्ये उचलण्यात अडचणी येत असून, फळांचे अपुरे पोषण होत आहे. परिणामी, आंबिया बहरातील फळपिकांवर फांदी मर (ट्विग ब्लाइट) आणि बुरशीजन्य देठ सुकी, फळगळ दिसून येत आहे..Orange Farming : मृग बहर गमावलेल्या संत्रा बागायतदारांना मदत करा .फांदी मर (ट्वीग ब्लाइट)लक्षणे ः या रोगामुळे प्रथम शेंड्याकडील फांद्यावरील पाने पिवळी पडतात. दुरूनच ती निदर्शनास येतात. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे व ती वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत. अशी पिवळी पाने गळून फांद्या तपकरी रंगामध्ये परावर्तित होतात. तपकिरी फांद्या कालांतराने पांढऱ्या भुरकट रंगाच्या होऊन त्यावर बुरशीची बीजफळांची निर्मिती होते. झाडाच्या मृत फांदीवर तयार झालेली बीजफळे पावसाच्या थेंबाद्वारे फळांवर पसरतात. किंवा वेगाच्या हवेद्वारेही या बिजफळांचा अन्यत्र प्रसार होतो. कमकुवत आणि रोग प्रतिकारशक्ती कमी असलेली झाडे या रोगास लवकर बळी पडतात. काही भागात संपूर्ण फांदी तपकिरी रंगाची म्हणजेच जळाल्यासारखी होऊन त्यावर पाने लटकलेली दिसतात..बुरशीजन्य देठ सुकी फळगळलक्षणे ः संत्रा फळझाडांमध्ये बुरशीजन्य फळगळ प्रामुख्याने कोलेटोट्रीकम ग्लोइओस्पोरिऑइड्स, बोट्रिओडिप्लोडिया थिओब्रोमी व अल्टरनेरिया या बुरशींमुळे होते. या बुरशींचा प्रादुर्भाव फळांच्या देठांस किंवा फळांची साल व देठ यांचे जोडावर होतो. त्यामुळे तिथे काळपट तपकिरी डाग पडल्याचे दिसते. तो भाग काही काळातच कुजतो. फळांची गळ होते. झाडांवर जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील तर बुरशींची बीजफळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतात. परिणामी, नुकसानकारक फळगळ आढळून येते. बरेचदा उशिरा झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळे पडतात, वजनाने हलके होऊन कडक होतात. अशी फळे दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहतात..Orange Farming: संत्रा फळांचा दर्जा, आकार राखण्यासाठी प्रयत्न.या रोगांच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजनाया रोगाच्या व्यवस्थापनासाठी झाडांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन, ओलीत व्यवस्थापनबरोबर वेळीच बुरशीनाशकांची फवारणी आवश्यक आहे.पावसाळ्याच्या आरंभीच झाडावरची सल काढणे गरजेचे असते. या काढलेल्या सल किंवा वाळलेल्या फांद्या त्वरित जाळून नष्ट कराव्यात. त्यामुळे त्यावरील सुप्तावस्थेत असलेले रोगकारक घटक वाढण्याची शक्यता कमी होते.छाटणी केल्यावर झाडांवर कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाइल १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी पंधरवाड्यातून एकदा करावी. त्यामुळे ही समस्या नियंत्रणात ठेवणे शक्य होते. .सद्यःस्थितीत ज्या बागांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, अशा ठिकाणी रोगग्रस्त फांद्या छाटून घ्याव्यात. ही छाटणी करताना रोगग्रस्त भागासोबत किंचित हिरवाही कट करून संपूर्ण निरोगा फांदी शिल्लक राहील, याची काळजी घ्यावी.फांद्याची छाटणी करण्याच्या प्रक्रियेत वापरली जाणारे कात्री किंवा सिकेटरचे निर्जंतुकीकरण करक राहावे. प्रत्येक रोगग्रस्त फांदी कापल्यानंतर अवजारे सोडिअम हायपोक्लोराइटच्या २ टक्के द्रावणाने निर्जंतुक करावे.खाली गळून पडलेल्या फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तशीच राहू देऊ नये, अन्यथा या रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होते. बागेतील वफे स्वच्छ ठेवावेत..बुरशीजन्य फळगळसाठी नियंत्रणात ठेवण्यासाठी फवारणी प्रति लिटर पाणी बोर्डो मिश्रण ०.६ टक्का किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम किंवा ॲझोक्सिस्ट्रोबिन अधिक डायफेनोकोनॅझोल (संयुक्त बुरशीनाशक) १ मिलि किंवा कॉपर सल्फेट अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम.(टीप ः संबंधित बुरशीनाशके लेबल क्लेम शिफारशीत किंवा ॲग्रेस्को मान्यताप्राप्त आहेत.)डॉ. योगेश इंगळे, ९४२२७६६४३७डॉ. दिनेश पैठणकर ७०३८०३७६४२अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प - फळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.