Chh. Sambhajinagar News : रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘कुशल’ कामाचे पैसे तत्काळ देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात मंगळवारी (ता. १२) ठिय्या आंदोलन केले. ‘पैसे द्या, पैसे द्या… कुशलचे पैसे द्या’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला..फुलंब्री तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे २०२१-२२, २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे काम पूर्ण होऊनही अनेक वर्षांपासून त्यांना कुशल कामाचे पैसे मिळाले नाहीत. मात्र आर्थिक गैरव्यवहार करून २०२५ मध्ये काम पूर्ण झालेल्या अनेकांना सदरील निधीचे वाटप करण्यात आले. भाजपच्या राजकीय दबावाला बळी पडून हा प्रकार झाल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. .MGNREGA Scam : मजुरांच्या खात्यात पैसे टाकणारे चौघे अटकेत.या वेळी पंचायत समिती कार्यालयासमोर विविध घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. नागपूर आयुक्तांकडून आलेल्या याद्या सर्वसामान्यांसाठी प्रसिद्ध कराव्यात. यादीप्रमाणेच पैसे खात्यावर जमा करावेत, त्याचबरोबर या रोजगार हमी योजनेच्या निधी वाटपात आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा मंगळवारी (ता. १९) दरी फाटा येथे जळगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला..या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, बाबूराव डकले, सरपंच आंबादास गायके, सदाशिव विटेकर, ज्ञानेश्वर जाधव, गोविंद गायकवाड, आकाश गायकवाड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती..MGNREGA Fund : ‘मनरेगा’च्या अंमलबजावणीत निधी उपलब्धतेचा अडसर .व्याजाने पैसे काढून केली कामेअनेक शेतकऱ्यांनी गाय गोठा व सिंचन विहिरीचे बांधकाम व्याजाने पैसे काढून केलेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहेत. पंचायत समिती प्रशासनाने तातडीने रक्कम अदा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.''.तालुक्यातील शेतकऱ्यांचे कुशलचे अनुदान देताना पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी भेदभाव केलेला आहे. यादीनिहाय अनुदान वाटप न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. त्याचबरोबर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान तत्काळ जमा करावे.- संदीप बोरसे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस.अनेक दिवसांपासून शेतकरी कुशलच्या अनुदानासाठी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र राजकीय दबावाला बळी पडून अनुदान वाटप करण्यात आले. त्यामुळे त्याच्या याद्या सर्वांसाठी नोटीस बोर्डवर चिकटवाव्यात. चुकीचे काम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.- बाबूराव डकले, शेतकरी पेंडगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.