Soybean
SoybeanAgrowon

Soybean Sowing 2025: यंदा सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता

Soybean Market Update: सोयाबीनपेक्षा मका आणि उसापासून परतावा चांगला मिळाला. त्यामुळे यंदाच्या (२०२५-२६) खरीप हंगामात शेतकरी सोयाबीनची पेरणी कमी करण्याची शक्यता आहे.
Published on

Pune News: सोयाबीनचे भाव मागील तीन वर्षांपासून कमीच होत आहेत. यंदा तर हमीभावापेक्षा १० ते २० टक्के कमी भाव मिळाला. सोयाबीनपेक्षा मका आणि उसापासून परतावा चांगला मिळाला. त्यामुळे यंदाच्या (२०२५-२६) खरीप हंगामात शेतकरी सोयाबीनची पेरणी कमी करण्याची शक्यता आहे. सोयाबीनऐवजी शेतकरी मका आणि उसाला पसंती देण्याचा विचार करत आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

देशात खरीप हंगामात सोयाबीन हे महत्त्वाचे पीक आहे. मात्र यंदा लागवड कमी होण्याची शक्यता असल्याने भारताची खाद्यतेल आयात वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन हे मुख्यतः कोरडवाहू क्षेत्रातील पीक आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्ये आहेत.

Soybean
Soybean MSP 2025: सोयाबीनला ५३२८ हमीभाव

केंद्र सरकारने गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनसाठी प्रति क्विंटल ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला होता. मात्र प्रत्यक्ष बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा १० ते २० टक्के कमी दर मिळाला. सोयापेंडचा मुख्य ग्राहक पोल्ट्री उद्योग आहे. पण मक्यापासून निर्मित डीडीजीएसचे भाव सोयापेंडपेक्षा किमान ३० टक्क्यांनी कमी आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून सोयापेंडची मागणी कमी झाली. त्याचा दरावर दबाव येत आहे.

मध्य प्रदेशातील देवास येथील शेतकरी सुबोध परमार म्हणाले, की मागील तीन वर्षांत सोयाबीनमधून नफा मिळणे कठीण झाले. त्यामुळे यंदा आम्ही मका लागवडीला पसंती देणार आहोत. मक्यातून सोयाबीनपेक्षा जास्त परतावा मिळतो.

Soybean
Soybean Rate: सोयाबीनचा भाव अजूनही हमीभावापेक्षा कमीच

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया, अर्थात सोपाचे कार्यकारी संचालक डी. एन. पाठक म्हणाले, की मागील काही महिन्यांपासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत. त्यामुळे शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने बुधवारी (ता. २८) यंदाच्या हंगामासाठी खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केले. त्यात सोयाबीनला ५३२८ रुपये हमीभाव मिळाला. सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव देण्याचे आश्‍वासन सरकारकडून पाळण्यात आले नाही.

इतर पिकांना पसंती

सोयाबीन पीक परवडत नसल्याने शेतकरी इतर पिकांचा विचार करत आहेत. महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात शेतकरी उसाला पसंती देत आहेत. तर इतर काही भागांत मक्याची लागवड वाढू शकते. मध्य प्रदेशातही शेतकरी मक्याकडे वळत आहेत.

सोयाबीनमध्ये ८० ते ८२ टक्क्यांपर्यंत पेंड असते, तर १८ ते २० टक्के तेल असते. परंतु इथेनाॅलसाठी मक्याचे गाळप केल्यानंतर मिळालेल्या स्वस्त डीडीजीएसमुळे देशांतर्गत सोयापेंडची मागणी कमी झाली. त्याचा दबाव सोयाबीनच्या दरावर आला.
बी. व्ही. मेहता, कार्यकारी संचालक, द साॅल्व्हेंट एक्स्ट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com