Dryland Wheat Agrowon
ॲग्रो विशेष

Dryland Wheat: कोरडवाहू परिस्थितीत भरघोस उत्पादन देणारे गव्हाचे ५ वाण

Wheat Varieties: राज्यात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. गहू राज्याच्या प्रमुख पिकांपैकी एक. त्यातील कोरडवाहू गव्हाच्या पेरणीला सुरुवात झाली असून या पेरण्या ५ नोव्हेंबरच्या आत कराव्यात असा सल्ला गहू संशोधन केंद्राने दिला आहे.

Swarali Pawar

Rabi Season: राज्यात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. गहू राज्याच्या प्रमुख पिकांपैकी एक. त्यातील कोरडवाहू गव्हाच्या पेरणीला सुरुवात झाली असून या पेरण्या ५ नोव्हेंबरच्या आत कराव्यात असा सल्ला गहू संशोधन केंद्राने दिला आहे. शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीनुसार त्याच्या वाणांची निवड करावी. अन्यथा गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होतो.

कोरडवाहू गव्हाचे वाण

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील विविध संशोधन केंद्रांनी कोरडवाहू जमिनीसाठी गव्हाचे वाण बनविले आहेत. यामध्ये नेत्रावती (NIAW 1415), फुले सात्विक (NIAW 3170), फुले अनुपम (NIAW 3624), NIDW-15 (पंचवटी), AKDW-2997-16 (शरद) पुसा उजाला (HI 1605), पुसा बहार (HD 2987), DBW 93, PBW 596, GW 1346, HI 8802, HI 8805, MACS 4058, NIDW 1149 या वाणांचा समावेश होतो.

ज्या गव्हाला शेतकरी केवळ एक ते दोनच वेळेस पाण्याची व्यवस्था करु शकतात. अशा कोरडवाहू / जिरायती पेरणीसाठी शेतकऱ्यांनी संशोधन केंद्रांनी दिलेल्या सुधारित वाणांचा वापर करावा. ही पेरणी २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. तसेच पेरणीसाठी हेक्टरी १०० किलो बियाणांची गरज असते. कोरडवाहू गव्हाची पेरणी करताना दोन ओळींमध्ये २० सेंमी इतके अंतर ठेवावे.

महाराष्ट्रासाठीचे वाण

यातील (NIAW 1415) नेत्रावती , NIDW-15 (पंचवटी), AKDW-2997-16 (शरद), फुले अनुपम, फुले सात्विक हे वाण महाराष्ट्रासाठी शिफारस केलेले आहे. हे वाण निफाड येथील गहू संशोधन केंद्राने शिफारस केलेले आहे.

नेत्रावती NIAW 1415

या वाणाची विशेष बाब म्हणजे अनुकुल परिस्थितीत उच्च उत्पन्न देणारे हे वाण आहे. हे वाण मध्यम ते भारी जमिनीत घ्यावे. या वाणासाठी थंड व कोरड्या हवामानाची गरज असते.

या वाणाचे बियाणे जिरायतसाठी एकरी ३० कि.ग्रॅ. आणि मर्यादित सिंचनाखाली एकरी ४० कि.ग्रॅ. वापरावे. या वाणाचा कालावधी १०५-११० दिवस असतो. तर मर्यादित सिंचनाखाली ११०-११५ दिवसांचा असतो.

या वाणाची उत्पादकता कोरडवाहू भागात एकरी ६-८ क्विं असते तर मर्यादित सिंचनाखाली एकरी १०-१२ क्विं इतके मिळते. या वाणाचे दाणे मध्यम आकाराचे असून ते चपातीसाठी उत्तम असतात.

नेत्रावती वाण मावा किडीस प्रतिकारक्षम असून काळा व नारगी तांबेरा रोगासही प्रतिकारक्षम आहे. यामध्ये प्रथिने १२ टक्के पेक्षा अधिक आहेत तर लोह, जस्त, तांबे, मॅगनीज हे पोषणमुल्ये आहेत.

पंचवटी NIDW-15

महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू पेरणीसाठी पंचवटी हे शिफारसीत आहे. या कोरडवाहू वाणाची मध्यम जमिनीत लागवड करावी. या वाणासाठी थंड व कोरडे हवामान गरजेचे असते.

कोरडवाहू पेरणीसाठी एकरी ३० कि.ग्रॅ. बियाणे वापरावे. या पिकाची पक्वता लवकर होते म्हमजेच कालावधी १०५ दिवसांचाच असतो. या वाणाची उत्पादकता कोरडवाहू जमिनीत एकरी ५ ते ६ क्विं इतकी असते.

या वाणाचे दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक असतात. तसेच यापासून शेवया, कुरडई, पास्ता आणि मॅकरोनी उत्तम प्रकारचे बनतात.

हे वाण मावा किडीस आणि तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे. तसेच या वाणामध्ये १२ टक्क्यांपेक्षा अधिक प्रथिने आढळतात.

फुले अनुपम NIAW 3624

महाराष्ट्रात एका ओलिताखाली वेळेवर पेरणीसाठी शिफारसीत हे सरबती वाण आहे. या वाणात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असते.

या वाणात प्रथिनांचे प्रमाण ११.४ टक्के असते. या वाणाचे दाणे आकर्षक आणि टपोरे असतात. शिवाय ते तांबेरा रोगासाठी प्रतिकारक्षम असून ते चपातीसाठी उत्तम वाण आहे.

या वाणाचा पक्व होण्याचा कालावधी १०५ ते ११० दिवसांचा असून एका ओलिताखाली उत्पादनक्षमता हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल असते.

फुले सात्विक NIAW 3170

महाराष्ट्रात संरक्षित ओलिताखाली वेळेवर पेरणीसाठी हे वाण शिफारसीत आहे. या सरबती वाणात प्रथिनांचे प्रमाण ११ ते १२ टक्के असते.

याचा बिस्कीट स्प्रेड मानक १० पेक्षा जास्त आहे. दाण्याचा कडकपणा खूप कमी म्हणजे ३५-४० टक्के इतका असतो. या वाणात लोह, जस्त, ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळतात.

तसेच ते तांबेरा रोगासाठी प्रतिकारक्षम आहेत. फुले सात्विक हे चपातीसाठी उत्तम वाण आहे. या वाणाचा पक्व होण्याचा कालावधी १०५ ते ११० दिवस असून एका ओलिताखाली उत्पादनक्षमता हेक्टरी ३५ ते ४० क्विंटल इतकी असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maha Pashudhan Expo 2025: परळीत १०-१२ डिसेंबरदरम्यान भरणार महापशुधन एक्स्पो २०२५ ; ५.८४ कोटींचा शासन निर्णय जाहीर

Sugarcane Price Protest: कोल्हापूर ऊसपट्ट्यात मोठ्या आंदोलनाची तयारी, ऊसदरावरून राजू शेट्टींची शेतकऱ्यांना हाक

Crop Loan: रब्बी पीककर्ज वाटपाचे २.८१ टक्के साध्य

Banana Crop Insurance: आंबिया बहरातील केळी पिकासाठी विमा योजना

Unseasonal Rain: मच्छीमारांवर अवकाळी पावसाची कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT