Wheat Farming
Wheat FarmingAgrowon

Wheat Variety : तापमानाचा ताण सहन करणाऱ्या गहू जाती

Wheat Farming : गहू हे विशेषतः उत्तर आणि मध्य भारतातील महत्त्वाचे पीक आहे. परंतु वाढत्या तापमानामुळे गहू पिकाच्या उत्पादनात अडचणी येत आहेत.
Published on

Agriculture Update : गहू हे विशेषतः उत्तर आणि मध्य भारतातील महत्त्वाचे पीक आहे. परंतु वाढत्या तापमानामुळे गहू पिकाच्या उत्पादनात अडचणी येत आहेत. २०२२ मध्ये अचानक वाढलेल्या तापमानामुळे भारतातील गव्हाचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाले होते. त्यामुळे उच्च तापमानाला सहनशील असणाऱ्या गव्हाच्या जातींची लागवड करणे महत्त्वाचे आहे.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राजबीर यादव आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किरण गायकवाड आणि तज्ज्ञांनी एचडी ३३८५, एचडी ३३८८ आणि एचडी ३४१० या जाती विकसित केल्या आहेत. या जाती चांगले उत्पादन देतात तसेच उष्णतेचा ताण सहन करण्याची त्यांची चांगली क्षमता आहे. तसेच चपातीसाठी उत्तम आहेत.

Wheat Farming
Wheat Cultivation : नियोजन उशिरा गहू लागवडीचे...

उत्पादनाची गुणवत्ता आणि फायदे :

एचडी ३३८५ :

ही जात पीक वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली या संस्थेमध्ये नोंदणीकृत झाली आहे. उत्तर आणि मध्य भारतात या जातीची लागवड वाढली आहे.

उत्पादनाची गुणवत्ता आणि फायदे :

एचडी ३३८५ :

ही जात पीक वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली या संस्थेमध्ये नोंदणीकृत झाली आहे. उत्तर आणि मध्य भारतात या जातीची लागवड वाढली आहे.

Wheat Farming
Wheat Cultivation : उशिरा गहू लागवडीचे नियोजन

तांबेरा आणि कर्नाल बंट रोग प्रतिकारक जात.

फुटव्यांची क्षमता अधिक. शिफारस केलेल्या बियाणांच्या मात्रेपेक्षा एकरी १० ते १५ किलो बियाणे कमी लागते.

उंची ९०-९८ सेंटिमीटर असून, खोड मजबूत आहे त्यामुळे पीक पडत नाही.

उत्पादन क्षमता सरासरी ६५ क्विंटल प्रति हेक्टर.

एचडी ३४१० आणि एचडी ३३८८ :

या जातींची मध्य प्रदेश, दिल्ली आणि पूर्व भारतातील राज्यांसाठी शिफारस.

उच्च उत्पादनाबरोबर वाढते तापमान सहन करण्याची क्षमता. चपातीसाठी अत्यंत उपयुक्त.

मध्य प्रदेशात एचडी ३४१० या जातीचा मोठ्या प्रमाणात प्रसार.

मोठ्या, चमकदार दाण्यांमुळे चांगला दर, निर्यातीसाठी पसंती.

- डॉ. किरण गायकवाड, ९९५३२५८२३४

(वरिष्ठ वैज्ञानिक, भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com