Fishermen Loss: गेल्या आठवड्याभराच्या अवकाळी पावसाने आणि वादळ वाऱ्यांनी मच्छीमार आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सागरी मासेमारी ठप्प झाली असून, बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली असली तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसते.