Sudam Mahale Agrowon
यशोगाथा

Poultry Business : दुष्काळात ‘पोल्ट्री’तून उभारला आर्थिक स्रोत

Success Story of Farmer : कोकराळे (ता. जि. नंदूरबार) येथील सुदाम महाले यांनी दुष्काळी भागात चिकाटीने व जिद्दीने ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसायातून सातत्य ठेवून त्यात यश मिळवले आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Poultry Farming : राज्यात नंदुरबार जिल्हा पोल्ट्री व्यवसायात आघाडीवर आहे. या भागात अनेक आदर्श पोल्ट्री उत्पादक पाहण्यास मिळतात. कोकराळे (ता. नंदुरबार) हा जिल्ह्यातील दुष्काळी भाग आहे. येथील सुदाम बाळू महाले यांनी कला शाखा व शिक्षणशास्त्र विषयातील पदविका घेतली आहे. सन २०१४ मध्ये नाशिक जिल्ह्यात एका खासगी आश्रम शाळेत त्यांना नोकरी लागली. रण त्यात मन न रमल्याने

शेतीचाच विकास करावा या हेतूने ते गावी परतले. अवर्षणप्रवण क्षेत्रात कोकराळे गाव येते. सुदाम यांची याच शिवारात १२ एकर हलकी, मुरमाड शेती आहे. एक म्हैस, एक बैलजोडी आहे. पावसाळा नसल्यास अडचणी तयार होतात. चार महिने देखील बागायती शेती करणे आव्हानात्मक असते. दोन विहिरी आहेत. गावात जलसंधारणाची कामे झाली आहेत. मात्र पाऊस चांगला झाला तरच काही काळ स्थिती चांगली राहते.

पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात

शेतीला भक्कम आर्थिक आधार हवा म्हणून २०१५ मध्ये सुदाम यांनी पोल्ट्री व्यवसायाची निवड केली. गोठाणे (ता. नंदुरबार) गावी मामा सुभाष धनगर यांच्यासोबत त्यांनी व्यवसायात भागीदारी केली. तेथे सुमारे अडीच हजार मांसल पक्ष्यांचे संगोपन केले जायचे. नफा होऊ लागला तसे साडेसात हजार पक्ष्यांचे संगोपन सुरू केले.

सहा वर्षे व्यवसाय जिद्दीने, चिकाटीने केला. कोविड काळात पाच ते सहा लाखांचे नुकसान सोसावे लागले. पण मोठ्या उमेदीने २०२१ मध्ये पुन्हा व्यवसाय सुरू केला. परंतु या वेळी भागीदारी न करता स्वतःच्या शेतात कोकराळे येथे पक्षी संगोपनगृह बांधले. त्यात साडेसात हजार पक्ष्यांचे संगोपन सुरू झाले. त्यानंतर पुन्हा तेवढ्याच संख्येचे अजून एक संगोपन गृह उभारले. आजघडीला सुमारे १४ हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे संगोपन केले जात आहे.

...असे आहे संगोपनगृह व व्यवस्थापन

रायगड येथील पोल्ट्री उद्योगातील एका कंपनीसोबत करार. त्यांच्याकडून पक्षी, खाद्य, औषधे आदींचा पुरवठा. कंपनी पक्ष्यांची थेट खरेदी करते.

३५० बाय ३२ फूट आकाराची दोन संगोपन गृहे. मध्यभागातील उंची १० फूट, तर आजूबाजूला आठ फूट उंची.

तापमान नियंत्रणासाठी सिमेंटचा पत्रा छतासाठी उपयोगात आणला. उन्हाळ्यात फॉगर्स लावले जातात. तापमान नियंत्रित ठेवल्याने पक्ष्यांची चांगली वाढ होते व उत्पादनही वाढते असे सुदाम यांचे निरीक्षण आहे.

वन्य प्राण्यांपासून सुरक्षेसाठी संगोपनगृहांना मजबूत तारांच्या जाळ्या बसविल्या आहेत.

हिवाळ्यात पक्ष्यांची वाढ चांगली होते. त्या काळात पक्ष्याचे वजन अडीच किलोच्या पुढे ते तीन किलोपर्यंत होते. उन्हाळ्यात मात्र त्याच्या वाढीवर मर्यादा येऊन वजन दोन ते अडीच किलोपर्यंत होते.कारण या काळात खानदेशात किंवा नंदुरबारात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असते. त्यामुळे पक्षी संगोपनावर अधिक मेहनत देखील घ्यावी लागते.

पक्ष्यांची मरतूक कमीत कमी होईल याची दक्षता घेतली जाते. ती साधारण दोन टक्क्यांपर्यंतच असते.

मजूर, वीज व पाण्याची व्यवस्था नेटकेपणाने करावी लागते.

संगोपनगृह भिजणार नाही याचीही काळजी घेतली जाते.

पक्ष्यांना आरामदायी बसण्यासाठी भाताच्या तुसाचा वापर केला जातो. त्यामुळे मातीचा स्पर्श होत नाही. ती पोटात जात नाही.

या व्यवसायातून चार जणांना रोजगार दिला आहे.

गुंतवणूक

या व्यवसायात सुदाम यांनी प्रति १४ हजार पक्षी संगोपनासंबंधी दोन संगोपनगृहांसाठी ३० लाख रुपये गुंतवणूक केली. त्यासाठी १० लाख रुपये कर्ज घेतले. पंतप्रधान योजनेचा लाभ घेतला असल्याने साडेतीन लाख रुपये अनुदानही मिळणार आहे. पक्ष्यांची खरेदी हमीभावात केली जाते.

तज्ज्ञांची मदत व मार्गदर्शन

सुदाम यांना पोल्ट्री व शेती व्यवसायात ‘स्मार्ट’ प्रकल्पाचे नंदुरबार तालुका प्रकल्प समन्वयक उमाकांत पाटील, कोळदा (ता. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ पद्माकर कुंदे, जितेंद्र मोरे, जुनेद शहा यांचे मार्गदर्शन मिळते.

अर्थकारण

सुमारे ४५ ते ५० दिवसांची एक बॅच असते. ती आटोपल्यानंतर पुढील १५ दिवस संगोपन गृहात स्वच्छता, निर्जंतुकीकरण या बाबी केल्या जातात. त्यानंतर नव्याने पुढील बॅच सुरू होते. करार केल्याने व्यवसायातील, किंबहुना विक्री व्यवस्थेतील जोखीम तशी कमी होऊन जाते. अलीकडील वर्षांचा विचार केल्यास प्रति किलो सहा रुपयांपासून ते १० रुपये असा दर मिळतो.

हिवाळ्यात नऊ रुपये तर उन्हाळ्यात सात रुपये दर मिळतो. प्रति बॅच खर्च वजा करता सुमारे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो. अर्थात, दरांवर संपूर्ण अर्थकारण अवलंबून राहते. खाद्याचा योग्य व नियोजनबद्ध वापर करून त्यातही बचत केली जाते. नासाडी टाळली जाते. त्यासाठी कंपनीच्या सर्व नियमांचे पालन केले जाते. त्याचा पुढे बोनस रक्कम मिळण्यात लाभ होतो.

शेतीतही आघाडी

महाले कुटुंबाची शेतीतही आघाडी आहे. लहान बंधू शशिकांत व वडील शेतीची जबाबदारी सांभाळतात. सुदाम पूर्णवेळ पोल्ट्रीचे व्यवस्थापन व विपणन पाहतात. शेतीत कापूस, कांदा, हरभरा व अधूनमधून कलिंगडाचे पीक असते. कापूस हे प्रमुख पीक आहे. दरवर्षी १० एकरांत लागवड असते. कापूस पिकात नैसर्गिक कीड नियंत्रणावर अधिक असतो.

गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कामगंध सापळे व अन्य जैविक, कमी खर्चिक बाबींचा वापर होतो. एकरी साडेसात क्विंटलपर्यंत कापसाचे उत्पादन मिळते. वर्षभरातील सहा बॅचेसमधून २० ते २४ ट्रॉलीपर्यंत कोंबडीखत उपलब्ध होते. गरजेएवढे शेतला वापरून उर्वरित खताची विक्री होते. त्याच्या वापरातून रासायनिक खतांवरील खर्च ६० ते ७० टक्के कमी झाला असून जमीन सुपीकतेला आधार मिळाला आहे. पिकांचे अवशेषही जमिनीत गाडले जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT