Poultry Farming : करार पद्धतीने केले यशस्वी कुक्कुटपालन

Poultry Business : सातारा तालुक्यातील फत्यापूर येथील अधिक अर्जुन कंठे यांची साडेचार एकर शेती. पोल्ट्री व्यवसाय करण्याचे निश्चित केल्यानंतर काही ब्रॉयलर पोल्ट्री शेडला भेटी दिल्या. करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय सुरु केला.
Poultry
Poultry Agrowon
Published on
Updated on

Farmer Management of Poultry Farming :

शेतकरी नियोजन - कुक्कुटपालन

शेतकरी : अधिक अर्जुन कंठे

गाव : फत्यापूर, ता. जि. सातारा

एकूण शेड : ३

पक्षी क्षमता : १२ हजार

सातारा तालुक्यातील फत्यापूर येथील अधिक अर्जुन कंठे यांची साडेचार एकर शेती. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते मुंबईमध्ये नोकरी करत होते. मात्र नोकरीच्या पगारातून घरखर्च भागत नसल्याने पुन्हा गावी आले. फलटण येथील मित्रांकडून पोल्ट्री व्यवसायाबद्दल माहिती मिळाली.

पोल्ट्री व्यवसाय करण्याचे निश्चित केल्यानंतर काही ब्रॉयलर पोल्ट्री शेडला भेटी दिल्या. करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय केल्यास पक्षी विक्रीसाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार नव्हते. पक्ष्यांसाठी २०१३ मध्ये चार हजार पक्षी क्षमतेचे १५० बाय ३० लांबी रुंदीच्या शेडची उभारणी केली. यात ब्रॉयलर कुक्कुटपालन करण्याचे नक्की केले.

Poultry
Poultry Management : ब्रॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापन

दोन वर्ष या व्यवसायातील बारकावे व अर्थशास्त्र समाजावून घेत २०१६ मध्ये १५० बाय ३० लांबी रुंदीचे चार हजार पक्षी क्षमतेचे दुसरे शेड उभे केले. त्यानंतर २०१८ मध्ये ५० बाय ३० लांबी रुंदीचे ४ हजार पक्षी क्षमतेचे तिसरे शेड उभे केले.

असे सध्या त्यांच्याकडे १२ हजार पक्षी क्षमतेची तीन शेड आहेत. त्या माध्यमातून वर्षभर प्रत्येक महिन्याला पक्ष्यांची बॅच निघते. व्यवसायात वर्षभर सातत्य ठेवल्याने चांगला आर्थिक फायदा होत असल्याचे अधिकराव सांगतात.

या व्यवसायात अधिक यांना आई यशोदा, पत्नी सौ. स्वप्नाली, बंधू शशिकांत, भावजय सौ. प्रमिला, बंधू संजय, भावजय सौ. वंदना यांची मदत होते. पोल्ट्री व्यवसायातून दर्जेदार कोंबडी खत उपलब्ध होते.

त्याचा वापर घरच्या शेतामध्ये केला जातो. त्यामुळे शेतामध्ये रासायनिक खतांवर होणार खर्च नियंत्रणात येऊन उत्पादनात वाढ मिळत असल्याचे अधिकराव सांगतात.

Poultry
Chicken Poultry Shed Security : पोल्ट्री शेडमधील जैवसुरक्षा महत्त्वाची...

नियोजनातील बाबी :

वर्षाला तीन शेडच्या माध्यमातून एकूण १२ बॅच घेतल्या जातात.

पिल्ले आणल्यावर पहिले तीन दिवस त्यांची विशेष काळजी घेतली जाते.

पाण्यासाठी प्रत्येक शेडमध्ये दोन हजार लिटरच्या पाणी टाक्या बसविल्या आहेत.

उन्हाळ्यात शेडमधील तापमान कमी करण्यासाठी फॉगर, स्प्रिंकरचा वापर केला जातो. तसेच शेडच्या पत्र्यावर पाचटाचे अच्छादन केले जाते. प्रत्येक शेडमध्ये टेबल फॅन लावण्यात आलेले आहेत.

प्रत्येक बॅच संपल्यानंतर शेडमधील कोंबडीखत बाहेर काढले जाते. त्यानंतर शेडमध्ये तूस पसरून घेतले जाते.

त्यानंतर शेडचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर चुना आणि मीठ वापर केला जातो. जेणेकरून बॅच सुरू झाल्यानंतर पक्ष्यांमध्ये कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.

शेडमध्ये साप, धामण या सारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचे आक्रमण होऊ नये यासाठी शेडच्या बाजूने रासायनिक घटक युक्त पावडर टाकली जाते.

पावसाळ्याच्या दिवसांत शेडमध्ये माश्यांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी विशेष काळजी घेतली जाते.

पिल्लांची खाद्याची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून निर्जंतुकीकरण केले जाते.

पाण्याच्या पाईपमध्ये शेवाळ होते. त्यासाठी विशिष्ट द्रावणाचा वापर करून पाइप स्वच्छ केले जातात.

पक्ष्यांना पुरविल्या जाणाऱ्या पाण्याचा पीएच वेळोवेळी तपासला जातो. त्यानुसार पीएच याचा समतोल राखून पाणी दिले जाते.

शेडमधील तापमान नियंत्रित राखणे आणि उष्ण, थंड वाऱ्यांपासून पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी तुती लागवड करण्यात आली आहे.

वेळोवेळी लसीकरण करण्यावर भर दिला जातो. जेणेकरून पक्ष्यांमध्ये होणारी मरतुक टाळली जाईल.

अधिक कंठे, ७७६८९३७३०३ (शब्दांकन : विकास जाधव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com