Poultry Business : देशी कोंबडी पालनात तरूणाची उद्योग भरारी

Mahesh Gaikwad

देशी कोंबडी पालन

अकोला जिल्ह्यातील निपाणा येथील बबन नाचोणे यांनी उच्चशिक्षित तरूणाने देशी कोंबडी पालन व्यवसायात भरारी घेतली आहे.

Poultry Business | Agrowon

पोल्ट्री व्यवसाय

बबन यांनी पोल्ट्री व्यवसाय उभारणीचे प्रशिक्षण घेतले असून योग्य व्यवस्थापन आणि मार्केटींगची व्यवस्था उभारली आहे.

Poultry Business | Agrowon

कोंबड्यांच्या जाती

कोंबडी पालनासाठी बबन यांनी कावेरी आणि सोनाली या देशी जातीच्या कोंबड्याची निवड केली आहे.

Poultry Business | Agrowon

गावरान अंडी उत्पादन

यातील कावेरी कोंबडी अंड्यासाठी तर सोनाली जातीची कोंबडी मांसासाठी निवडली आहे. सुरूवातील बबन यांनी ५०० कावेरी आणि १००० सोनाली जातीच्या कोंबड्या आणून व्यवसायची सुरूवात केली.

Poultry Business | Agrowon

गावरान चिकन

कावेरी कोंबड्यापासून पाच ते सहा महिन्यांनी अंडी मिळण्यास सुरूवात झाली. या कोंबड्या साधारणपणे दोन वर्षांपर्यंत अंडी देतात. या माध्यमातून सध्या दिवसाला २५० ते ३०० नगांपर्यंत अंडी उत्पादन होते.

Poultry Business | Agrowon

पोल्ट्री व्यवस्थापन

चिकनसाठी वापरली जाणारी सोनाली कोंबडी ६० ते ७० दिवसांत तयार होते. या काळात ती एक किलो वजनापर्यंत तयार होते.

Poultry Business | Agrowon

विक्री व्यवस्था

बबन यांनी अंडी आणि चिकन विक्रीची व्यवस्था जागेवरच उभा केली आहे. ज्यामुळे वाहतुकीच्या अतिरिक्त खर्चात बचत होते. कोंबड्याच्या विक्री २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो आणि अंडी प्रति नग १२ रुपये या दराने जागेवर विकली जातात.

Poultry Business | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....