Silkworm Cocoon Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Silkworm Cocoon Prices : रेशीम कोषांच्या दरात चढउतार

Market Fluctuation : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम कोष मार्केटमध्ये कोषांच्या दरात चढउतार होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत दरात सोमवारी (ता. १६) काहीशी घट झाली.

Team Agrowon

Baramati News : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम कोष मार्केटमध्ये कोषांच्या दरात चढउतार होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत दरात सोमवारी (ता. १६) काहीशी घट झाली. सोमवारी प्रतिकिलो ५८० रुपये दर मिळाला असून सरासरी ५६५ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. शुक्रवारी (ता. ६) प्रतिकिलो ७३० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला होता. सरासरी दर प्रतिकिलो ६९० रुपये मिळाला.

सध्या बारामती बाजार समितीचे रेशीम मार्केट हे ऑनलाइन असल्याने महाराष्ट्र राज्यातील तसेच कर्नाटक, तमिळनाडु, पश्चिम बंगाल या राज्यातील खरेदीदार यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे कोषास चांगला दर मिळत आहे. काही वेळेस कमी दर होत आहे. रेशीम कोषाच्या दरात वाढ होत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात तुती लागवडीकडे वळत आहेत.

बारामतीमध्ये पारदर्शक व्यवहार, कोषाचे इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर अचूक वजन, ऑनलाइन पेमेंट, कुठलीही कटती नाही, यामुळे रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कोष बारामती रेशीम कोष मार्केटमध्येच विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कोष खरेदीसाठी व्यापाऱ्यांना तसेच रिलर यांना लायसेन्स दिले असल्याने महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील लासन्सधारक खरेदीदार कोष ऑनलाइन खरेदी करीत आहेत. रेशीम मार्केटमध्ये सोमवारी (ता. १६) एकूण ७२७ किलो कोषांची आवक होऊन किमान ४७० रुपये तर सरासरी ५६५ रुपये दर मिळाला.

खेडमधील दोंदे येथील शिवाजी बारणे, हिराबाई बनकर, पुष्पा बारणे, रामा बारणे या रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांच्या कोषास जादा दर मिळाला आहे. २०२२ मध्ये रेशीम मार्केट सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ७ कोटींची उलाढाल झाली असून एकूण १६० टन कोष विक्री झाली आहे. बारामतीसह पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा या जिल्ह्यांतून शेतकरी कोष घेऊन येत असून जादा दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT