शेतकऱ्यांना आता कृत्रिम बुद्धिमता (AI) आधारित स्थानिक हवामान अंदाजाचा फायदा१३ राज्यांतील शेतकऱ्यांनी एआय निर्मित पाऊस अंदाजाची माहिती घेत पीक पेरणीची तारीख बदललीकेंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची राज्यसभेत माहिती.AI in Agriculture: शेतकऱ्यांना आता कृत्रिम बुद्धिमता (AI) आधारित स्थानिक हवामान अंदाजाचा फायदा होत आहे. १३ राज्यांतील शेतकऱ्यांना एआय निर्मित स्थानिक पातळीवर पाऊस अंदाजाची माहिती मिळाली. या आधारावर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतकामाचे नियोजन केले. निम्म्या शेतकऱ्यांनी यावरुन २०२५ च्या खरीप हंगामात पीक पेरणीचा निर्णय बदलला, अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली..एका प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, २०२५ च्या खरीप हंगामात देशातील १३ राज्यांमधील काही भागात शेतीसाठी मान्सूनच्या आगमनाचा अंदाज कळवण्यासाठी एआय आधारित प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला होता. संभाव्य अंदाजांत केवळ मान्सून कधी दाखल होईल? याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, जो शेतकऱ्यांना पीक पेरणीची तारीख निश्चित करण्यासाठी गरजेचा होता..AI in Agriculture: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शेतीमध्ये परिवर्तनाला चालना.मान्सूनच्या आगमनाच्या अंदाजाची माहिती एम-किसान (M-Kisan) पोर्टलच्या माध्यमातून १३ राज्यांतील ३ कोटी ८८ लाख ४५ हजार २१४ शेतकऱ्यांना देण्यात आली. हिंदी, ओडिया, मराठी, बंगाली आणि पंजाबी भाषांमध्ये एसएमएसद्वारे हवामान अंदाज पाठवण्यात आला. याद्वारे शेतकऱ्यांनी पीक पेरणीचे नियोजन केले.."यानंतर मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये किसान कॉल सेंटरद्वारे टेलिफोनवरून शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात असे दिसून आले की ३१ ते ५२ टक्के शेतकऱ्यांनी पीक पेरणीच्या वेळेत बदल केला. यात पीक आणि बियाणे, खत आणि कीडनाशके आदी शेतीतील घटकांच्या निवडीचा समावेश होता," असे ते म्हणाले..Cotton, Soya AI Model: कापूस, सोयाबीन, मका उत्पादकांनाही होणार फायदा?.भारतीय हवामान विभागाकडील (IMD) १२५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्जन्यमानाची आकडेवारीवर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता अंदाज प्रणाली (AIFS) विकसित करण्यात आली. त्यासाठी मोफत उपलब्ध असलेल्या ओपन-सोर्स मॉडेलचा वापर करण्यात आला. हा प्रायोगिक प्रकल्प हवामान विभाग आणि डेव्हलपमेंट इनोव्हेशन लॅब, इंडिया यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे..दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, सरकारने शेतपीक उत्पादकता, शाश्वत शेती, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि शेती क्षेत्रातील विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एआय पद्धतींचा वापर केला आहे..'किसान ई-मित्र'वर दररोज ८ हजार शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन'किसान ई-मित्र' हा आवाजावर आधारित एआय चलित चॅटबॉट आहे. हा शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, पंतप्रधान पीक विमा योजना आणि किसान क्रेडिट कार्डबाबत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास मदत करतो. यातून ११ प्रादेशिक भाषांमधून शेतकऱ्यांना माहिती मिळते. यावर दररोज सुमारे ८ हजार शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले जाते. याद्वारे आतापर्यंत ९३ लाखांहून अधिक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.