Silkworm
SilkwormAgrowon

Silkworm Market : दहा दिवसांत ५७ क्विंटल रेशीम कोषाची आवक

Market Update : राज्यात सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या जालना उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत २ ते १२ डिसेंबर दरम्यान ५७ क्विंटल रेशीम कोषाची आवक झाली.
Published on

Chhatrapati Sambhajinagar News : राज्यात सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या जालना उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत २ ते १२ डिसेंबर दरम्यान ५७ क्विंटल रेशीम कोषाची आवक झाली.

यंदा १२ डिसेंबरपर्यंत २३४.७ टन रेशीम कोषाची आवक झाली होती. जालना उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत होत असलेली आवक लक्षात घेता यंदा वर्षखेरपर्यंत किमान ५०० टन रेशीम कोषाची आवक होण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

Silkworm
Silkworm Pest : रेशीम कीटकावरील उझी माशीचे एकात्मिक नियंत्रण

२ डिसेंबरला गत दहा दिवसांतील सर्वाधिक २० क्विंटल आवक झालेल्या रेशीम कोषाला ३७ हजार ५०० ते ६७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान, तर सरासरी ६१ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. ३ डिसेंबरला ६ क्विंटल आवक झालेल्या रेशीम कोषाचे सरासरी दर ६० हजार रुपये प्रतिक्विंटल राहिले.

४ डिसेंबरला ४ क्विंटल आवक झालेल्या रेशीम कोषाला सरासरी ५८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ५ डिसेंबरला आवक ५ क्विंटल झाली, यासाठी सरासरी दर ६८ हजार रुपये प्रतिक्विंटल राहिला. ६ डिसेंबरला ५ क्विंटल आवक झालेल्या कोषाला सरासरी ५५ हजार प्रति क्विंटलचा दर मिळाला.

Silkworm
Silkworm Post-Processing Training Centre : बारामतीत होणार रेशीम कोषोत्तर प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र

७ डिसेंबरला एक क्विंटल आवक झालेल्या कोषाचे दर ४९ हजार रुपये प्रतिक्विंटल राहिले. ९ डिसेंबरला आवक २ क्विंटल, तर सरासरी दर ३९ हजार प्रतिक्विंटल राहिले. १० डिसेंबरला ३ क्विंटल आवक झालेल्या कोषाला ५६,५०० रुपये दर मिळाला. ११ डिसेंबरला रेशीम कोषाची आवक ४ क्विंटल, तर सरासरी दर ४७ हजार राहिला. १२ डिसेंबरला ७ क्विंटल आवक झालेल्या कोषाला सरासरी ४३, ५०० रुपये दर मिळाला. या वेळी कोषाचे किमान दर ३६,५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

बीडला सर्वाधिक आवक

रेशीम कोष खरेदी सुरू असलेल्या जालना, बीड, बारामती, बडनेरा आणि पूर्णा या बाजारपेठांमध्ये कमी अधिक प्रमाणात रेशीम कोषांची आवक होते आहे. त्यामध्ये सर्वाधिक आवक बीड येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत होत असून, त्यानंतर जालना, बारामती, बडनेरा व पूर्णा येथील बाजारपेठेचा क्रमांक लागतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com