डॉ. अरुण कुलकर्णी
Agriculture Future Prices :
फ्युचर्स किमतीः सप्ताह-१४ ते २० डिसेंबर २०२४
गहू, हरभरा, मोहरी, सोयाबीन, सोयातेल, सोयामील, पामतेल, मूग आदी शेतीमालाचे फ्युचर्स व ऑप्शन्स व्यवहार २० डिसेंबर २०२१ रोजी प्रथम एक वर्षासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर ही बंदी दोन वेळा एक-एक वर्षासाठी वाढवली गेली.
या वर्षी मात्र, १९ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार, ही बंदी फक्त ३१ जानेवारी २०२५ पर्यंतच वाढवली गेली आहे. त्याच दिवशी प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या परिपत्रकानुसार हळद, धने व जिरे यांचे ऑप्शन्स व्यवहार आता सुरू करण्यात आले आहेत. कदाचित पुढील काही महिन्यांत इतर शेतीमालाचेही फ्युचर्स व्यवहार पुन्हा सुरू होण्याची ही पूर्वसूचना असेल.
कापसाची आवक अजूनही वाढती आहे. मका व सोयाबीन यांची आवक आता कमी होऊ लागली आहे. टॉमटोची आवक पुढील काही दिवस वाढती राहील. तुरीची आवक सुरू झाली आहे. पुढील महिन्यात ती वाढू लागेल. या सप्ताहात तुरीची किंमत मोठ्या प्रमाणावर कमी झाली. कापूस, मका, हळद यांचे भाव घसरले. सोयाबीनच्या किमती हमीभावापेक्षा लक्षणीय कमी आहेत. टोमॅटो व कांदा यांच्या किमती सुद्धा या सप्ताहात उतरल्या. २० डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेतः
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ५३,७६० वर आले होते. या सप्ताहातसुद्धा ते ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ५३,२६० वर आले आहेत. जानेवारी फ्युचर्स भाव १.५ टक्क्यांनी घसरून रु. ५३,९३० वर आले आहेत. मार्च भाव रु. ५६,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाची आवक वाढती आहे.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात ०.५ टक्क्यांनी घसरून रु. १,३९० वर आले आहेत. फेब्रुवारी फ्युचर्स ४.९ टक्क्यांनी घसरून रु. १,४१० वर आले आहेत तर एप्रिल फ्युचर्स रु. १,४८६ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ६.९ टक्क्यांनी अधिक आहेत.
कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. सध्याचे भाव (स्पॉट व फ्यूचर्स) हमीभावापेक्षा कमी आहेत.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात रु. २,४४५ वर आल्या आहेत. जानेवारी फ्युचर्स किमती रु. २,४४५ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स रु. २,४७५ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.२ टक्क्यांनी अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात ०.५ टक्क्यांनी घसरून रु. १३,६५५ वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती ०.१ टक्क्यांनी वाढून रु. १३,९८८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.४ टक्क्यांनी अधिक आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) या सप्ताहात रु. ६,६५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७.८०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. किमती कमी होत आहेत.
सोयाबीन
या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,२६७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजार भाव कमी आहे.
तूर
गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) ७.८ टक्क्यांनी घसरून रु. ९,२९७ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा १०.९ टक्क्यांनी घसरून रु. ८,२०९ वर आली होती आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे. पुढील सप्ताहात आवक वाढू लागेल.
कांदा
कांद्याची (लाल, लासलगाव) किंमत या सप्ताहात रु. ३,१९४ वर आली आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) घसरून रु. १,८०० वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.