Farmer Protest
Farmer ProtestAgrowon

Onion MSP : ‘कांद्याला हमीभाव द्या’

Onion Update : कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात घसरण सुरूच असून शनिवारी (ता.२१) लिलाव सुरू झाल्यानंतर छावा सेना व कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडत येवला-मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
Published on

Nashik News : कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात घसरण सुरूच असून शनिवारी (ता.२१) लिलाव सुरू झाल्यानंतर छावा सेना व कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडत येवला-मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

Farmer Protest
Onion Rate : आवक वाढल्याने कांदादरात घसरण ; वाशीच्या एपीएमसी घाऊक बाजारात ४० रुपयांनी विक्री

देशात लाल कांद्याची आवक वाढल्याने लासलगावसह जिल्हाभरातील बाजार समित्यांमध्ये कांदा दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याला सरासरी १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शनिवारी संतप्त छावा क्रांतिवीर सेना व कांदा उत्पादकांनी बाजार समितीतील लिलाव बंद पाडत येवला- मनमाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

Farmer Protest
Onion Auction : दर घसरल्याने लासलगावला कांदा लिलाव बंद पाडले

या वेळी तहसीलदार आबा महाजन, पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांना निवेदन देत आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख गोरख संत, तालुकाप्रमुख प्रफ्फुल गायकवाड, विजय मोरे, छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी संदीप पवार, सोपान लांडगे, गोरख कोटमे, संदीप बार्शीले, गोरख सांभारे, जालिंदर मेटकर, विजय चव्हाण, अण्णासाहेब सोमासे, कांदा उत्पादक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com