Palghar News: वाडा तालुक्यातील चिंचघर व डोंगस्ते ग्रामपंचायतींच्या हद्दीत कार्यरत असलेल्या एका खासगी कंपनीने शासनाची परवानगी व रॉयल्टी न घेता प्रचंड प्रमाणावर माती उत्खनन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मेणे यांनी उपविभागीय अधिकारी (वाडा) यांच्या कार्यालयात दाखल केली आहे..ही कंपनी १५ वर्षांपासून काचेच्या सजावटी उत्पादनांवर काम करत असून, कंपनीच्या विस्तारित प्रकल्पासाठी सर्वे क्रमांक १२(२)ब येथील मोठ्या टेकड्यांचे बेकायदा उत्खनन करत आहे. हे गैरकृत्य कित्येक महिन्यांपासून सुरू असल्याचा आरोप रवींद्र मेणे यांनी केला. त्यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याने शासन याबाबत जाणूनबुजून निष्क्रिय राहात आहे, असा आरोप त्यांनी केला. .Soil And Water Conservation Scam : पाच कोटींचा घोटाळा माफ करण्याचा प्रस्ताव.ते म्हणाले, की महसूल विभागाकडे सर्व पुरावे, व्हिडिओ, पंचनामे देऊनही अधिकारी हलगर्जीपणे वागतात. महसूलचा वरदहस्त असल्यामुळे कंपनी बेधडक काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तातडीने कारवाई न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला..Land Scam: बीडच्या महसूलमध्ये आणखी एक घोटाळा उघड.महसूल विभाग मूक का?वाडा तालुक्यात अनेक ठिकाणी माती उत्खनन सुरू असून, मुंबई-वडोदरा–पनवेल मार्गासाठीही लाखो ब्रास माती वाहून नेण्यात आली, मात्र महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई न करता जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे..मी फक्त उत्पादन व्यवस्थापन पाहतोउत्खननाबाबत मला काहीही माहिती नाही, असे संबंधित कंपनीचा व्यवस्थापक अंजीत झा यांनी सांगितले आहे, तर तक्रारीची चौकशी करून नियमांनुसार कारवाई केली जाईल, असे वाड्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप चव्हाण यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.