Satara News: अतिवृष्टी नुकसान भरपाई आतापर्यंत अकरा हजार १५१ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर सहा कोटी १९ लाख तीन हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे. अद्याप सव्वातीन हजार शेतकऱ्यांची भरपाई रक्कम प्रलंबित असून, त्यांच्यासाठी फार्मर आयडीला पर्याय म्हणून ई केवायसी करण्याची सूचना महसूल विभागाने केली आहे. त्यामुळे बॅंकेकडे ई- केवायसी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहेत; पण भविष्यात शेतकऱ्यांना फार्मर आयडी हा काढावाच लागणार आहे..जिल्ह्यात अतिवृष्टीत पाच हजार ७८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. याचा १४ हजार ५०१ शेतकऱ्यांना फटका बसला होता. यामध्ये कऱ्हाड, पाटण, वाई, महाबळेश्वर, कोरेगाव, सातारा, खटाव, माण या तालुक्यांतील शेतकऱ्यांचा समावेश होता. यामध्ये सर्वाधिक नुकसान खटाव १३५३, माण १२४१, म्हसवड १५५१, तसेच सप्टेंबरमधील अवकाळीचे खटाव २८२, माण ३२८, म्हसवड ९५१ हेक्टर असे एकूण ५७८१ हेक्टरवरील नुकसानी झाली होती. त्यासाठी आठ कोटी ७८ लाख आठ हजार रुपये भरपाई जाहीर करण्यात आली होती. .Farmer ID: सोलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित.ही भरपाईची रक्कम शासनाकडून जिल्ह्याला मिळाल्यानंतर त्याचे खातेनिहाय शेतकऱ्यांना वाटप सुरू झाले. त्यानुसार जिल्ह्यातील १४ हजार ५०१ शेतकऱ्यांची आठ कोटी ७८ लाख आठ हजार रुपये वाटप सुरू झाले होते. त्यामध्ये काही शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्याने त्यांना मदतीची रक्कम मिळणे अवघड झाले होते. यावर पर्याय म्हणून महसूल विभागाने असे शेतकरी मदतीच्या रकमेपासून वंचित राहू नयेत, यासाठी बॅंक केवायसी करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे जे शेतकरी केवायसी करतील त्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होणार आहे..Farmer ID: फार्मर आयडीअभावी सव्वातीन हजार शेतकरी मदतीपासून वंचित.आतापर्यंत अकरा हजार १५१ शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा कोटी १९ लाख तीन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित सव्वातीन हजार शेतकरी भरपाईपासून प्रलंबित आहेत. त्यांना आता ई- केवायसी करून घेणे बंधनकारक असेल; पण भविष्यात या शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढावी लागणार आहे. अन्यथा अशा शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे..‘ग्रामपंचायत स्तरावर फार्मर आयडी काढून मिळावेत’शेतकऱ्यांना ई-सेवा केंद्र, महा ई- सेवा केंद्र व इतर ठिकाणी फार्मर आयडी काढण्यासाठी मारावे लागणारे हेलपाटे, तसेच सर्व्हर डाऊनचा त्रास लक्षात घेता, ग्रामपं सातारा : जिल्ह्यात रब्बी कांदा लागवडीस वेग आला आहे. पुसेगाव (ता. खटाव) येथील संतोष बाबुराव जाधव यांच्या शेतात सुरू असलेली कांदा लागण. ( छायाचित्र ऋषिकेश पवार ) चायत स्तरावरच फार्मर आयडी काढून देण्यासाठी शासनाने सोय करायला हवी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.