Agriculture Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: काबुली हरभऱ्याचे दर टिकून; कापूस, मूग, गूळ, तसेच काय आहेत आजचे टोमॅटो भाव?

Daily Commodity Rates: आज आपण मूग, काबुली हरभरा, गूळ, टोमॅटो आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

मुगाचे दर दबावातच

मुगाला चालू हंगामात कमी भाव मिळत आहे. यंदा देशातील मुगाचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. तसेच आयातही चांगली सुरु आहे. त्यामुळे मुगाच्या भावावर दबाव दिसून येत आहे. चालू हंगामात मुगाने हमीभावाचाही टप्पा पार केला नाही. केंद्राने यंदा मुगाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ६५२ रुपये हमीभाव जाहीर केला. तर बाजारात सध्या ७ हजार ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. बाजारातील आवकही पुढील काळात कमी होण्याचा अंदाज आहे. पण उन्हाळी मुगाची आवक पुढे असेल. त्यामुळे मुगाचे भाव पुढील काही आठवडे या पातळीच्या दरम्यानच दिसू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

काबुली हरभरा टिकून

देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन कमी झाले. काबुली हरभऱ्याचा पेरा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये वाढला होता. मात्र बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसला. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पिकाला पोषक थंडीच जाणवली नाही. त्यातच तापमान सरासरीपेक्षा अधिक राहीले. त्यामुळे उत्पादन कमी राहीले. परणामी दरही टिकून आहेत. एप्रिल महिन्यापासून काबुली हरभरा ११ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. यापुढील काळात बाजारातील काबुली हरभऱ्याची आवक कमी होत जाईल. मात्र काबुली हरभऱ्याला उठाव चांगला राहील. त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दरही टिकून राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

गुळाचे भाव टिकून

देशात यंदा उसाचे उत्पादन कमी झाले. कारखान्यांनाही उसाची टंचाई भासत होती. गुऱ्हाळांनाही यंदा ऊस कमी मिळाल्याचे गुऱ्हाळचालकांनी सांगितले. याचा परिणाम गूळ उत्पादनावर झाला. गेल्यावर्षीपेक्षा यंदाचे गुळाचे उत्पादन कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे गुळाचे भाव टिकून आहेत. सध्या गुळाला गुणवत्तेप्रमाणे राज्यातील बाजारात ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढील काळात गुळाला मागणी वाढत जाऊन दरालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज गूळ बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत. 

टोमॅटो दर तेजीत

टोमॅटो दरातील तेजी आजही टिकून होती. तोडणीला आलेला टोमॅटोचे सततच्या पावसाने नुकसान झाले. यामुळे बाजारातील टोमॅटो आवकही कमी होत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात सुधारणा दिसून येत आहे. गुणवत्तापूर्ण टोमॅटो अनेक बाजारात २५०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. तर सरासरी दरपातळी २ हजार रुपयांवर पोचली आहे. यापुढील काळातही टोमॅटोची आवक कमी होणार आहे. त्यामुळे दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

कापूस स्थिर

बाजारातील कापसाची आवक कमी झाली आहे. मात्र दुसरीकडे सीसीआयची कापूस विक्री सुरु आहे. तसेच सुताला उठाव कमी असल्याचे सांगितले आज आहे. त्यामुळे बाजारातील कापूस आवक कमी होऊन देखील कापसाचे भाव स्थिर आहेत. कापसाचा भाव मागील काही दिवसांपासून ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. यापुढील काळात बाजारातील आवक आणखी कमी होणार आहे. मात्र सीसीआयची कापूस विक्री कायम राहील. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावात आहेत. याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसू शकतो. त्यामुळे कापसाचे भावही सध्याच्या पातळीदरम्यान दिसून शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jal Shakti Hackathon 2025: जल व्यवस्थापनासाठी ‘जलशक्ती हॅकेथॉन-२०२५’

NAFED Procurement Center: ‘नाफेड’च्या सोयाबीन खरेदी केंद्रांवर शुकशुकाट

Soybean Future Ban: शेतीमालावरील वायदेबंदी उठविण्याच्या हालचाली

Agriculture Electricity: शेतकऱ्यांना विजेपासून वंचित ठेवणे वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग

Sugar Production: साखर उत्पादनात महाराष्ट्रच अव्वल

SCROLL FOR NEXT