

फ्यूचर्स किमती सप्ताह १७ ते २३ मे २०२५
मॉन्सूनचे आगमन या वर्षी लवकर होण्याच्या वार्तेने आणि बऱ्याच राज्यांत मॉन्सूनपूर्व पाऊस सुरू झाल्याने पुढील वर्षी उत्पादन वाढते होईल अशी अपेक्षा आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी पाऊस सरासरीइतका किंवा अधिक राहील. तसे झाले तर यापुढे पिकांच्या, विशेषतः खरीप पिकांच्या, किमती घसरू लागतील.
या सप्ताहात कांदा व टोमॅटो वगळता सर्व पिकांच्या किमती घसरल्या. कांद्याची व टॉमटोची आवक यापुढे कमी होईल व त्यांच्या भावात वाढ होईल. गेल्या तीन महिन्यांत हरभरा, मूग व तूर यांच्या किमती उतरता कल दाखवत आहेत.
खरीप पिकासाठी पुढील वर्षासाठीचे हमीभाव मे महिन्याअखेर जाहीर होण्याची अपेक्षा आहे. २३ मे २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात ०.१ टक्क्याने वाढून रु. ५४,४०० वर आले आहेत. जुलै फ्युचर्स भाव ०.९ टक्क्याने घसरून रु. ५४,६३० वर आले आहेत. सप्टेंबर भाव रु. ५७,५०० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.५ टक्क्यांनी अधिक आहेत. अमेरिकेतील कापसाचे भाव या सप्ताहात १.५ टक्क्याने वाढले.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) गेल्या सप्ताहात रु. १,४८५ वर आले होते. या सप्ताहात ते ०.५ टक्क्याने घसरून रु. १,४७७ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स ०.७ टक्क्याने घसरून रु. १,५२८ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.४ टक्क्यांनी अधिक आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५७० वर आले आहेत.
कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (गुलाबबाग) गेल्या सप्ताहात रु. २,२४० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. २,२२१ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. २,२३२ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स रु. २,२४३ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.६ टक्क्याने अधिक आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात १.९ टक्क्याने वाढून रु. १४,६०२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.५ टक्क्याने घसरून रु. १४,३८९ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती ४ टक्क्यांनी घसरून रु. १४,०५४ वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १४,२६६ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ०.९ टक्क्याने कमी आहेत. सांगली मधील (राजापुरी) स्पॉट भावसुद्धा १.७ टक्क्याने घसरून रु. १५,६०० वर आला आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात १.२ टक्क्याने घसरून रु. ५,९७५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी घसरून रु. ५,८०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे. आवक वाढती आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) ५.८ टक्क्यांनी घसरून रु. ७,२७५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ४,४९५ वर आली होती. या सप्ताहात ती १.१ टक्क्याने घसरून रु. ४,४४४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजार भाव कमी आहे. अमेरिकेतील सोयाबीनचे भाव या सप्ताहात १ टक्क्याने वाढले.
तूर
गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) रु. ७,२८० वर आली होती. या सप्ताहात ती घसरून रु. ६,८१६ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. आवक कमी होऊ लागली आहे.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत या सप्ताहात ५.४ टक्क्यांनी वाढून रु. १,१७० वर आली आहे. कांद्याची आवक कमी होत आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,१६७ वर आली होती. या सप्ताहात ती रु. १,७०० वर गेली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.