Amaravati News: शासनाने किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) सोयाबीन खरेदीची घोषणा करून भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) मार्फत खरेदी केंद्रे सुरू केली असली, तरी प्रत्यक्षात या केंद्रांवर शुकशुकाट पसरलेला आहे. गुणवत्ता, ओलावा व तांत्रिक निकषांच्या नावाखाली सोयाबीन खरेदीस सर्रास नकार दिला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत..यंदा अतिवृष्टी व बदलत्या हवामानाचा फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. ही परिस्थिती माहिती असूनही शासनाने गुणवत्ता व ओलावा निकषांत कोणतीही शिथिलता न दिल्याने हमीभाव खरेदी योजना कागदावरच उरल्याचा आरोप होत आहे..Soybean Procurement: गंगाखेड केंद्रावर साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी.खरेदी केंद्रावर गेलेल्या शेतकऱ्यांना कधी ओलावा जास्त, कधी दाण्याचा आकार लहान, तर कधी गुणवत्ता निकष अपुरे असल्याचे कारण देत परत पाठवले जात आहे. हमीभावाने खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांना खुल्या बाजारात ४ हजार रुपये क्विंटल दराने सोयाबीन विकावे लागत असून, या व्यवहारात त्यांचे १३२८ रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे नुकसान होत आहे. परिणामी उत्पादन खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. यातून शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे..Soybean Procurement Center: सोयाबीन खरेदी केद्रांवर शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद.खरेदी केंद्र सुरू असल्याचा अहवाल शासनाकडे सादर होत असला, तरी प्रत्यक्ष खरेदी अत्यंत नगण्य आहे. आजपर्यंत अवघ्या ४१५ क्विंटल सोयाबीनचीच खरेदी झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत याच कालावधीत किमान १५ हजार क्विंटल खरेदी होणे अपेक्षित होते. गुणवत्ता तपासणी करून वखार महामंडळाच्या गोदामात पाठविलेला मालही काही वेळा परत पाठवला जात असल्याने खरेदी यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..असंतोष आंदोलनात रूपांतरित होण्याची शक्यतायंदाच्या हंगामाची परिस्थिती लक्षात घेऊन गुणवत्ता व ओलावा निकषांत तातडीने सवलत द्यावी. तसेच ‘नाफेड’ला स्पष्ट आदेश देऊन प्रत्यक्ष खरेदी सुरू करावी, अन्यथा शेतकऱ्यांचा असंतोष आंदोलनात रूपांतरित होण्याची शक्यता असल्याचा इशारा शेतकरी व संघटनांकडून देण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.