Chana And Wheat Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana, Wheat Sowing : रब्बीत तेलबिया, धान्य पिकांची लागवड कमी; शेतकऱ्यांची गहू, भात, हरभऱ्याला पसंती

Market Update : रब्बीत आतापर्यंत गहू, तांदूळ, हरभरा आणि ज्वारीचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा वाढलेला दिसत आहे. सोयाबीनमध्ये असलेल्या मंदीमुळे मोहरी, भुईमूग आणि करडीची लागवड कमी दिसत आहे.

Anil Jadhao 

Pune News : रब्बीत आतापर्यंत गहू, तांदूळ, हरभरा आणि ज्वारीचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा वाढलेला दिसत आहे. सोयाबीनमध्ये असलेल्या मंदीमुळे मोहरी, भुईमूग आणि करडीची लागवड कमी दिसत आहे. तर गेल्या आठवड्यापर्यंत आघाडीवर असलेली मक्याची लागवड आता गेल्यावर्षीपेक्षा ४.१ टक्क्याने पिछाडीवर गेली आहे.

देशातील रब्बी पेरणीचा वेग सुरुवातीला गेल्यावर्षीपेक्षा जास्त होता. मात्र २० डिसेंबरपर्यंतच्या पेरणीत क्षेत्र गेल्यावर्षीपेक्षा काहीसे कमी दिसत आहे. देशात ५९० लाख ८२ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील हंगामापेक्षा क्षेत्र १५ हजार हेक्टरने कमी दिसत आहे. गेल्यावर्षी पिकांची पेरणी उशीरा सुरु झाली होती. त्यामुळे सुरुवातील लागवड क्षेत्र कमी दिसत होते. मात्र आता जसजसा पेरणीचा कालावधी पुढे जात आहे तसे चिक्ष स्पष्ट होत आहे. देशात रब्बीचे सरासरी क्षेत्र ६३५ लाख ६० हजार हेक्टर आहे. म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या ९३ टक्के पेरा झाला आहे.

तेलबिया पेरणी ५.६ टक्क्यांनी कमी

खरिपात सध्या तेलबिया पिकांना कमी भाव मिळत आहे. सोयाबीन हमीभावापेक्षा किमान २० टक्के भावाने विकले जात आहे. त्यामुळे रब्बीतील तेलबिया पिकांची पेरणी ५.६ टक्क्यांनी कमी दिसते. मोहरीची लागवड ५.६ टक्क्यांनी आतापर्यंत पिछाडीवर पडली. तर भुईमूग पेरणी ७.४ टक्क्यांनी आणि करडीची पेरणी ४.३ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. तेलबियांचे भाव कमी असल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळात आहेत.

भरडधान्यही पिछाडीवर

देशात २० डिसेंबरपर्यंत ज्वारी वगळता इतर भरडधान्याची पेरणी २.५ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. ज्वारीचा पेरा ३.९ टक्क्यांनी गेल्यावर्षीपेक्षा आघाडीवर आहे. तर मक्याची लागवड आता ४.१ टक्क्यांनी पिछाडीवर गेली. बार्लीच्या लागवडीत १७.४ टक्क्यांची घट दिसत आहे.

हरभरा पेरणी २ टक्क्यांनी पुढे

रब्बीचा पेरा सुरु झाल्यानंतर तूर, मूग, उडीद आणि हरभरा भावातील तेजी कमी झाली. मात्र हरभरा आजही हमीभावापेक्षा जास्त दरात विकला जात आहे. त्यामुळे हरभरा पेरणी जवळपास २ टक्क्यांनी आघाडीवर आहे. मात्र मसूरची लागवड ४ टक्क्यांनी घटली. त्यामुळे एकूण कडधान्य पेरा १ टक्क्याने कमी दिसतो.

गहू, तांदळाला पसंती

पेरणीत आतापर्यंत गव्हाची लागवड २.५ टक्क्यांनी वाढली. तर तांदळाचे क्षेत्र ३.५ टक्क्यांनी जास्त आहे. भरडधान्य, मसूर आणि तेलबिया पिकांचे कमी झालेले क्षेत्र गहू आणि तांदळाकडे वळालेले दिसत आहे. कारण गहू आणि तांदळाचे भाव आजही टिकून आहेत. त्यामुळे शेतकरी गहू आणि तांदळाला पसंती देत असल्याचे दिसून येते. तसेच मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारने गहू खरेदीसाठी हमीभावावर बोनस जाहीर केला. याचाही परिणाम पेरणीवर दिसून येत आहे.

रब्बीतील पिकांची लागवड (लाख हेक्टरमध्ये)

पीक…२०२४…२०२३…वाढ/घट (%)

गहू…३१२.२८…३०४.७७…२.५

भात…१२.८५…१२.४१…३.५

एकूण कडधान्य…१२५.६४…१२६.८९…-१

हरभरा…८६…८४.४२…१.९

मसूर…१७.०६…१७.७६…-४

एकूण भरडधान्य…४४.८४…४६…२.५

ज्वारी…२१.४३…२०.६२…३.९

मका…१६.०५…१६.७५…-४.१

बार्ली…६.६२…८…-१७.४

एकूण तेलबिया…९५.२२…१००.८९…-५.६

मोहरी…८८.५…९३.७३…-५.६

भुईमूग…२.८९…३.१२…-७.४

करडई…०.६१…०.६४…-४.३

एकूण पेरणी…५९०.८२…५९०.९७…०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT