
Parbhani News : परभणी ः परभणी व हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात शुक्रवार (ता. २०) पर्यंत हरभऱ्याची २ लाख ९० हजार ६३१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. १ लाख ५१ हजार ७१९ हेक्टर (१३५.२६ टक्के) आणि १ लाख ५१ हजार ७१९ हेक्टर (१३५.२६ टक्के) हरभरा पेरणीचा समावेश आहे.
या दोन जिल्ह्यातील १४ पैकी १३ तालुक्यात हरभऱ्याचा सरासरी क्षेत्राहून अधिक पेरा झाला आहे. या दोन जिल्ह्यात एकूण रब्बीची ४ लाख ४२ हजार २५६ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. २०) पर्यंत २ लाख ७० हजार ७९४ पैकी २ लाख ६४ हजार ९५६ हेक्टरवर (९७.८४ टक्के ) पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार १७० असताना प्रत्यक्षात १ लाख ५१ हजार ७१९ हेक्टर (१३५.२६ टक्के) पेरणी झाली.
ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ८९ हजार ३३१ हेक्टर (७८.९९ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी २१ हजार ६२७ हेक्टर (५५.०२ टक्के, मक्याची २ हजार ८६ पैकी ८३४ हेक्टर ३८ टक्के) पेरणी झाली. करडईची ३ हजार ३७१ पैकी १ हजार ८५३ हेक्टर (३५.०२ टक्के), जवसाची ११९ पैकी ३४ हेक्टर (२८.५७ टक्के), तिळाची ३३.६४ पैकी १९ हेक्टर (५६.४८ टक्के) पेरणी झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात १ लाख ७६ हजार ८९१ असतांना प्रत्यक्षात १ लाख ७७हजार ३०० हेक्टरवर (१००.०३ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याची १ लाख ३८ हजार ९१२ हेक्टर (११५.६२ टक्के) पेरणी झाली. ज्वारीची १३ हजार २०२ हेक्टर (११२.८७ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी २४हजार २४६ हेक्टर (२७.०४ टक्के), मक्याची ९७१ पैकी ३८९ हेक्टर (४०.०३ टक्के) पेरणी झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.