राजेंद्र भटजगण्याच्या विचित्र धुंदीत आपल्याला निसर्गचक्र सुदृढ राखण्याचे भानच राहिले नाही. आपल्याला शेतीतून पैसा तर मिळायला हवाच, पण त्याच सोबत निरोगी व आनंदी जीवनासाठी निसर्गपूरक शेती करण्याकडेही लक्ष द्यावे लागेल. घराच्या गरजांबरोबरच माती आणि परिसंस्थेच्या गरजा पूर्ण करणारी शेतीची रचना तयार करावी लागेल. त्यासाठी आपले गावशिवार आणि स्वतःच्या लागवड क्षेत्राचा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे..नमस्कार मंडळी, आपल्याला आयुष्यात काय हवं असतं हो? या प्रश्नाला तुमचं काय उत्तर असेल? जगणं आनंदी असावं, हेच तर उत्तर आहे. आपण सर्वजण आनंदी, निरोगी, समाधानी आयुष्य मिळवण्यासाठीच दगदग करत असतो. सुखी आनंदी आयुष्यासाठी आपण भरपूर कष्ट घेतो आणि त्यासाठीच तर पैसे मिळवतो. खरं ना? भरपूर पैसे मिळवून कष्ट करून हे मिळवता येईल असे आपल्याला वाटत असते. कुणाला पैसा, कुणाला सत्ता, कुणाला स्थावर जंगम मालमत्ता यामधून सुख मिळेल असे वाटते..Agriculture Success Story; करडईची उत्कृष्ट शेती, दर्जेदार बियाणे निर्मिती .पण कालांतराने लक्षात येते की सुखसमाधान, आरोग्य मिळविण्यासाठी पैसे कमावण्याच्या नादात फक्त ताण, आजार, कामात अतिव्यग्रता हेच मिळाले. कितीही सोईसुविधा असल्या तरी जीवनातील आनंद, आरोग्य, समाधान आपण गमावून बसतो आहोत. आपले शरीर, मन, विचार, अंतरात्मा ही निसर्गाची रचना आहे. समृद्ध निसर्गातच आनंदी जीवनाची सर्व फळे आपल्याला मिळू शकतात. आनंदी निरोगी जगण्यासाठी तसे नैसर्गिक वातावरण आवश्यक असते..आज जगभर विकास होत आहे . पण तो कसा करत आहोत? तर आपण सर्वांनीच निसर्गाच्या मूळ शाश्वत रचनेकडे पूर्ण दुर्लक्ष करुन विकासाचा अश्व सुसाट सोडला आहे. मानवाच्या महत्वाकांक्षा, अभिलाषांची परमोच्च पातळी गाठताना निसर्गाला अक्षरशः ओरबाडले. त्यामुळेच भौतिक सुखसाधने मिळविण्याच्या अनिवार ओढीमुळे प्रचंड मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. वास्तवच विसरल्यामुळे किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेल्यामुळे किंवा त्याविषयीच्या अज्ञानामुळे आता यातील काही समस्या आपल्याला दिसू लागल्या आहेत आणि दुर्दैवाने आपण आपल्या हव्यासापोटी जे केले त्यांचे परिणाम आपल्या मुलाबाळांना भोगावे लागणार आहेत. हे आपल्याला अजूनही समजत नाही..Agriculture Success Story; करडईची उत्कृष्ट शेती, दर्जेदार बियाणे निर्मिती .विसरलोय निसर्गाची रचना...निसर्गरचनेत आनंदी, निरोगी जगण्यासाठी आवश्यक असे महत्त्वाचे घटक म्हणजे जल, जंगल व जमीन. पण खरे सांगू का, आज आपण निसर्गात जगत असताना हे विसरलो आहोत, की हे तिन्ही घटक संतुलित राहिले तरच आपले जगणे आनंददायी होईल. आपण आपल्या जगण्यासाठी व्यवसाय काहीही करत असलो तरी आनंदी जगण्याची साधने खरे तर सर्वांसाठी सारखीच आहेत..आपण निसर्गाच्या सर्वच घटकांचा वापर करत असतो, पण त्याची परतफेड करण्याची जबाबदारी विसरलो आहोत. विधात्याने किंवा निसर्गाने किंवा परमेश्वराने ही जी रचना उत्क्रांती घडवत परिपूर्णतेकडे नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे आकलन न करता फक्त मानवी उपभोग याच गोष्टीकडे आपण लक्ष दिले. निसर्गाची अत्यंत सुदृढ व्यवस्था ज्या चक्रांवर आधारित आहे त्यातील काही चक्रांचा अभ्यास आपण शालेय शिक्षणात केला आहे. पण जगण्याच्या विचित्र धुंदीत आपल्याला निसर्गचक्र सुदृढ राखण्याचे भानच राहिले नाही..आज ज्या समस्या आपल्याला जाणवत व भेडसावत आहेत, आपल्यासह सृष्टीच्या नाशाकडे नेत आहेत, त्या आपणच निर्माण केलेल्या आहेत. त्यांचे निराकरण आपल्यालाच करायचे आहे आणि ते आजही आपल्याला शक्य आहे. समस्या निर्माण होण्याची कारणे शोधून ती कारणे नाहीशी करणे म्हणजेच समस्यांची निर्मिती थांबवणे. या समस्या म्हणजे जलवायू परिवर्तन, जागतिक तापमानवाढ..यामुळे काय काय होऊ शकते याची चुणूक आपण गेल्या काही दिवसांत जगभरात पाहिली. चूक पूर्णपणे सुधारायची वेळ जवळपास निघूनच गेलेली आहे. आपण फक्त विनाशाची गती कमी करू शकतो. थांबवणे अशक्य आहे. आपल्या सर्वांच्या कर्मामुळे आपली सृष्टी/पृथ्वी कॅन्सरग्रस्त झाली आहे. धरतीमातेला, परिसंस्थेला झालेला कॅन्सर तिसऱ्या अवस्थेत आहे याची जाणीवच आपल्याला नाही. थोडे विचारपूर्वक भोवताली पाहिले तरी परिस्थितीची भयावहता लक्षात येते.(संपूर्ण लेख वाचा २०२५ च्या अॅग्रोवन दिवाळी अंकात)अंक खरेदीसाठी लिंक- https://shorturl.at/TJmdc.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.