Wheat Sowing : थंडीमुळे गव्हाची ९७ टक्के पेरणी

Wheat Farming : गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगलीच थंडी वाढल्याने किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागात गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला.
Wheat farming
Wheat farmingAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगलीच थंडी वाढल्याने किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागात गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला. आतापर्यंत विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी एक लाख ६२ हजार ८९९ म्हणजेच ९७ टक्के पेरणी झाली असून, पिके जोमात असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

चालू वर्षी पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच गव्हाच्या पेरणीस नोव्हेंबर ते डिसेंबर हा कालावधी चांगला असतो. मात्र दिवाळीनंतर काहीसे ढगाळ वातावरण तयार झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केली.

Wheat farming
Wheat Farming : गहू पिकातील तण नियंत्रणाचे उपाय

त्यातच उशिराने ऊस तोडणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी उशिराने गव्हाच्या पेरण्या केल्या आहेत. सध्या अनेक ठिकाणी गहू पिके उगवून आली असून वाढीच्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील उत्तरेकडील भाग, अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, सोलापुरातील अक्कलकोट, मंगळवेढा, माळशिरस, दक्षिण सोलापूर, मोहोळ ही तालुके गव्हाच्या पिकांसाठी ओळखली जातात.

विभागात अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्या तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. आतापर्यंत अहिल्यानगरमध्ये सरासरीच्या ६ हजार ८२८ हेक्टरपैकी सुमारे १० हजार २९५ हेक्टर म्हणजेच १५१ टक्के गव्हाची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल पाथर्डी, श्रीगोंदा, नेवासा तालुक्यांतही चांगली पेरणी झाली आहे. तर शेवगाव, राहुरी, पारनेर, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यांत बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहेत.

Wheat farming
Wheat Sowing : गव्हाची ३८ हजार ५१४ हेक्टरवर पेरणी

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात सर्वाधिक गव्हाची पेरणी झाली आहे. सुमारे ६ हजार ४४९ हेक्टरपैकी ५ हजार १५९ हेक्टर म्हणजेच ८० टक्के पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ जुन्नर, दौंड, शिरूर तालुक्यांत चांगल्या पेरण्या झाल्या आहे. तर हवेली, मुळशी, मावळ, वेल्हे, भोर, पुरंदर तालुक्यांत कमी पेरण्या झाल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातही अक्कलकोटमध्ये सरासरीच्या ९ हजार ६८५ हेक्टरपैकी ७ हजार ४८९ हेक्टर म्हणजेच ७७ टक्के पेरणी झाली आहे. त्यानंतर उत्तर सोलापूर, माळशिरस, मंगळवेढा, माढा या तालुक्यांत चांगलीच प्रमाणात पेरणी झाली आहे.

पुणे विभागात झालेली गव्हाची पेरणी, हेक्टरमध्ये

जिल्हा --- सरासरी क्षेत्र --- झालेली पेरणी -- टक्केवारी

नगर --- ८६,४०५ -- ९०,१०७ ---१०४

पुणे --- ३९,८०३ --- २८,२८२-- ७१

सोलापूर --- ४२५८८ --- ४४,५१० -- १०५

एकूण -- १,६८,७९६ -- १,६२,८९९ -- ९७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com