Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या तीन जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगाचा अहवाल येणे सुरू आहे. तुरळक ठिकाणी मूग व उडदाची उत्पादकताही पुढे आली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या अडथळ्यामुळे या प्रयोगात अडथळा आला असला तरी या पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावरच पीक विमा परताव्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे..प्राप्त माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ लाख ६३ हजार ३० हेक्टरवर मका पिकाची लागवड झाली होती. या पिकाची काढणी सुरू असून १९२ कापणी प्रयोगापैकी ११८ म्हणजे सुमारे ३६ टक्के पीक कापणी प्रयोग झाले. या प्रयोगासाठी निवडलेल्या गावांपैकी १७ ठिकाणी पीकच आढळून आले नाही. त्यामुळे तो प्रयोग आता त्याचं मंडळातील इतर गावात किंवा इतर महसूल मंडळातील गावात घेतला जाईल. बाजरीची ९५४५ हेक्टरवर पेरणी झाली होती. .Crop Harvesting : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत ज्वारी, मका, काढणी सुरू.या पिकाच्या एकूण १९२ पीक कापणी प्रयोगापैकी ५२ पीक कापणी प्रयोग प्राप्त झाले. तर ८८ ठिकाणी पीकच न आढळल्याने ते प्रयोग आता इतरत्र होतील.मुगाची ११,५८८ हेक्टरवर पेरणी झाली. मुगाची काढणी पूर्ण झाली असून ४६८ पिकं कापणी प्रयोगांपैकी ३८५ एक कापणी प्रयोग प्राप्त झाले त्यापैकी २३ ठिकाणी पीकच आढळून आले नसल्याचा अहवाल आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र २७,८०० हेक्टर असताना प्रत्यक्ष ३२,६८२ हेक्टर वर सोयाबीनची पेरणी झाली या पिकाचे ३१२ पीक कापणी प्रयोगापैकी २८३ पीक कापणी प्रयोग झाले आहेत.जालना जिल्ह्यात बाजरीची ३२६३ हेक्टरवर पेरणी झाली. या बाजरी पिकाच्या १९२ पीक कापणी प्रयोगापैकी ३४ पिकं कापणी प्रयोग झाले..Crop Harvesting : खानदेशात पीक काढणी, मळणीस वेग. शिवाय २४ ठिकाणी पीक न आढळल्याने आता ते प्रयोग इतरत्र होतील. मका पिकाची ५७,३४५ हेक्टरवर लागवड झाली. या पिकाच्या १९२ पीक कापणी प्रयोगापैकी ७० पीक कापणी प्रयोग प्राप्त झाले. मुगाची १३०४४ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली. काढणी पूर्ण झालेल्या या पिकाच्या ४०८ पैकी ३८५ प्रयोग प्राप्त झाले असून २३ ठिकाणी एकच आढळून आले नसल्याचा अहवाल प्राप्त आहे. .उडदाचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ४५० हेक्टर असताना प्रत्यक्षात ६३१९ हेक्टरवर उडदाची पेरणी झाली. काढणी अंतिम व्यक्तीत असलेल्या या पिकाच्या १४४ पीक कापणी पर्यंत पैकी १३२ प्रयोग प्राप्त झाले तर १० ठिकाणी पीकच आढळून आले नसल्याचा अहवाल आहे. सोयाबीनची २ लाख १२ हजार ४४०४ हेक्टरवर पेरणी झाली. काढणी सुरू असलेल्या सोयाबीनच्या ३१२ पीक कापणी प्रयोगापैकी १४२ पीक कापणी प्रयोग प्राप्त झाले आहेत..बीड जिल्ह्यात मुगाची १३ हजार ८५ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली. या पिकाची काढणी पूर्ण झाली असून ९ क्विंटल १९ किलो ४८१ ग्राम हेक्टरी उत्पादकता येत असल्याचे कृषी विभागाने कळविले आहे. उडदाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार ६९६ हेक्टर असताना प्रत्यक्षात ५१ हजार ६१० हेक्टर वर उडदाची पेरणी झाली. पिकाची काढणी अंतिम टप्प्यात असून पीक कापणी प्रयोगानुसार हेक्टरी ९ क्विंटल ३० किलो २३२ ग्रॅम उत्पादकता आल्याचे कृषी विभागाने कळविले आहे..पीक कापणी प्रयोगासाठी रँडमली निवड होणाऱ्या गावात पीक न आढळल्यास संयुक्त स्वाक्षरीने तसे कळवून तो पीक कापणी प्रयोग त्याचं मंडळातील लगतच्या गावात किंवा इतर मंडळातील गावात घेण्याचे नियोजन केले जाते. - प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.