Animal Husbandry Department
Animal Husbandry Department Agrowon
काळजी पशुधनाची

Veterinary Service : राज्यात पशुसेवेसाठी लागू होणार तीन पदांचा पॅटर्न

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘‘पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांना देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये सुसूत्रता आणण्यासह सेवांचा दर्जा सुधारावा, या उद्देशाने राज्याच्या पशुसंवर्धन विभागात तीन पदांचा पॅटर्न राबविला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळात या पॅटर्नला मंजुरी मिळाली असतानाच लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे,’’ अशी माहिती महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास गाडे यांनी दिली.

राज्यात सद्यःस्थितीत तीन श्रेणी दोनच्या प्रमाणात एक श्रेणी एकचा पशुवैद्यक दवाखाना असे प्रमाण आहे. यातील जिल्हा परिषदेकडे ८७ आणि राज्य सरकारकडे १३ टक्‍के पशुवैद्यक दवाखान्याचे सनियंत्रण आहे. यातील श्रेणी दोनच्या दवाखान्यावर पदविका (डिप्लोमा) धारक पशुधन पर्यवेक्षकांची नियुक्‍ती पशुचिकित्साकामी करण्यात आली आहे.

पदविकाधारक पशुधन पर्यवेक्षकांनी पदवीधारक (बीव्हीएस) च्या सनियंत्रणात सेवा देणे अपेक्षीत आहे. तरीसुद्धा राज्यात बहुतांश दवाखान्यांत पशुधन पर्यवेक्षक सेवा देत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला. त्याचीच दखल घेत शासनाने पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाची पुनर्रचना करीत या पॅटर्नला मान्यता दिली आहे.

पुर्नरचनेनुसार प्रत्येक पशुचिकित्सालयात एक पदवीधारक डॉक्‍टर, त्याला मदतनीस म्हणून पदविकाधारक व कंत्राटी पद्धतीने एक बहुविध सेवा देणारा कर्मचारी अर्थात शिपाई राहील. दवाखाना उघडणे, बंद करणे व इतर किरकोळ काम याच्या माध्यमातून होतील. पूर्वी एकाच माणसावर लसीकरण, जंतांची औषधे देणे, ड्रेसिंग करणे व इतर किरकोळ उपचार करणे अशा जबाबदाऱ्या होत्या. आता जनावरांचे रोग नियंत्रण आणि उपचारासाठी स्वतंत्र पदवीधर उपलब्ध होणार आहे. लसीकरणाची प्रक्रिया देखील पदवीधारक पशुवैद्यकाच्या सनियंत्रणात होईल.

पशुसंवर्धन विभागाची राज्य स्थिती

एकूण पशुवैद्यकीय संस्था-४८४८

जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालये-३३

तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालये-१६८

पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १-१७४१

पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २-२८४१

फिरते पशुचिकित्सालय-६५

पशुरोग अन्वेषण विभाग-१

पशुरोग अन्वेषण विभाग प्रादेशिकस्तर-७

पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था-१

मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रे-४

सधन कुक्‍कुट विकास गट-१६

अनेक वर्षानंतर पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना होणार आहे. पदवीधारक त्याला सहाय्यक म्हणून पदविकाधारक आणि बहू सेवा देणारा कंत्राटी कर्मचारी अशी रचना राहील. त्यामुळे सेवांमध्ये सुसूत्रता राहून दर्जा देखील सुधारेल. आता लवकरच या रचनेची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा आहे.
- डॉ. रामदास गाडे, महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटना, पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Healthy Ambadi : आरोग्यदायी पौष्टिक अंबाडी

Market Price Kolhapur : कोथिंबिरीची पेंढी ४० रुपयांना, लोणच्याच्या आंब्यांना मागणी

Rural Development : पंचायत राज रचनेतून ग्राम विकासाला चालना

Mango Festival Kolhapur : कोल्हापुरात आंबा महोत्सव, कृषी पणन मंडळाकडून आयोजन

Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

SCROLL FOR NEXT