Swabhimani Us Parishad: स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २४ वी ऊस परिषद आज (दि. १६) जयसिंगपूरमधील विक्रमसिंह क्रिडांगणावर होणार आहे. यावर्षीच्या उसाला पहिली उचल किती घ्यायची? आणि आंदोलनाची पुढील दिशा कोणती असेल?, हे या परिषदेमध्ये ठरणार आहे. महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील उत्पादक शेतकऱ्यांचे या परिषदेकडे लक्ष लागले आहे..गेल्या २४ वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस गळीत हंगाम सुरू होण्याआधी ऊस परिषदेचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून आंदोलनाची दिशा ठरवून दर निश्चिती झाल्यानंतर साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरळीत सुरू होतो. या ऊस परिषदेत सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि उत्तर कर्नाटकच्या सीमा भागातील शेतकरी सहभागी होतात..Farmer Loan Waiver : कर्जमुक्तीचा वायदा न पाळल्यास तीव्र आंदोलन; राजू शेट्टी.गेल्या पंधरा दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटेनेने विविध भागांत शेतकरी मेळावे, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ऊस परिषदेबाबत माहिती दिली आहे. विशेषत: काटामारी, रिकव्हरी चोरी, तोडणी वाहतूक आणि उपपदार्थांमधून साखर कारखानदार लुबाडणूक करू लागल्याचा स्वाभिमानीचा आरोप आहे. गेल्या पाच वर्षात एफआरपीमध्ये ६५० रूपयांची वाढ झाली आहे. पण उसाचा दर ३ हजार ते ३२०० रुपयांच्या दरम्यान स्थिर राहिला आहे. खते, बी -बियाणे, कीडनाशकांच्या किमती, मजुरी यात मोठी वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे..Raju Shetti: काटा मारणारेच भाजपमध्ये; कारवाईचे धाडस दाखवा: राजू शेट्टी.राज्य सरकार आणि साखर संघाने एकरकमी एफआरपीमध्ये मोडतोड करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल २५०० रूपये आणि मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना २ हजार ते २२०० रूपये पहिली उचल मिळणार आहे. याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांचे म्हणणे आहे.यामुळे आजच्या ऊस परिषदेत पहिली उचल किती असावी?, अंतिम दर किती मिळावा?, याची मागणी ते करतील. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.