Mahesh Gaikwad
प्राचीन काळापासून भारतात पशुपलान हा शेतीला पूरक असा व्यवसाय राहिला आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
गेल्या काही काळात अनेक शेतकऱ्यांचा पशुपालनाकडे ओढा पाहायला मिळत आहे. परंतु त्यांना याबाबतची अधिकची माहिती नसते.
पशुपालन म्हटले की गायी-म्हशींचा गोठा हे चित्र आपल्या समोर उभे राहते. परंतु याशिवाय कोणकोणते पशु आहेत, ज्याचे संगोपन करून पैसे मिळवू शकता.
शेळीच्या दुधाला अलिकडच्या काळात चांगली मागणी असल्याने तुम्ही शेळीपालन करू शकता. तसेच मांसासाठी शेळी-बोकडांनाही चांगली मागणी असते.
कोंबड्यांप्रमाणे तुम्ही बटेर पालनही करू शकता. अनेक रेस्टॉरंटमध्ये बटेर पक्ष्याच्या मांसाचे पदार्थ मिळतात. यातून तुम्ही चांगला नफा कमवू शकता.
पारंपरिक पशुपालनासोबतच बाजारपेठेची मागणी लक्षात घेता तुम्ही वराहपालनाल करू शकता.