Animal Husbandry : पशुपालनातील जैवसुरक्षितता महत्त्वाची...

Animal Care : वाहतूक करण्यापूर्वी जनावरांची पशुतज्ज्ञांकडून आरोग्य तपासणी करून घ्यावी. जी जनावरे व्यायलेली किंवा गाभण आहेत त्यांची वाहतूक दोन ते तीन आठवड्यांपर्यंत टाळावी.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

डॉ. रूपेश वाघमारे, डॉ. प्रकाश केकाण, डॉ. विठ्ठल धायगुडे

Biosecurity of Animal Husbandry : जैवसुरक्षा म्हणजे संसर्गजन्य व तत्सम आजारांपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रादेशिक तथा फार्म वरती आखलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीची एकत्रित प्रक्रिया.

जैवसुरक्षा योजनेची अंमलबजावणी केल्यामुळे आजाराचा प्रसार थांबतो. त्यामुळे जनावरांचे आरोग्य आणि उत्पादन सुधारण्यास मदत होते.

व्यवस्थापन

नवीन जनावर कळपात मिसळणे आणि जनावर इतरत्र घेऊन जाणे यावर अंकुश ठेवावा. यामुळे नवीन संसर्गजन्य आजार पसरणार नाही. खरेदी करण्यापूर्वी आरोग्य तपासणी करावी.

नवीन जनावर लगेच कळपांमध्ये मिसळू नये. २४ तास विलगीकरणामध्ये ठेवावे. जंतनाशकाची मात्रा द्यावी.

आजारी जनावरांवर उपचार करून पुन्हा विलगीकरणामध्ये ठेवावे. वेगवेगळ्या चाचण्या कराव्यात.

आजारी जनावर आणि इतर जनावरांच्या गोठ्यामध्ये खाद्याचे भांडे, पाण्याचे भांडे आणि इतर साधनांची देवाणघेवाण करू नये.

वाहतूक करण्यापूर्वी पशुतज्ज्ञांकडून आरोग्य तपासणी करावी. जी जनावरे व्यायलेली किंवा गाभण आहेत त्यांची वाहतूक दोन ते तीन आठवड्यापर्यंत टाळावी.

Animal Husbandry
Animal Husbandry : पशुपालन,सेवा क्षेत्रामध्ये डेन्मार्कची आघाडी

चारा, इतर खाद्य

चारा, खाद्याद्वारे संसर्गजन्य आजार तसेच तणनाशक, कीटकांची विषबाधा होऊ शकते.

व्यवस्थित साठवणूक न केल्यास बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे चारा व खाद्य कोरड्या ठिकाणी साठवावे.

खाद्य खरेदी करताना चांगल्या व योग्य उत्पादकाकडून खरेदी करावे. खाद्यामध्ये इतर कोणत्याही प्रकारचे विषयुक्त घटक नाहीत याची खात्री करून घ्यावी.

कामगार आणि नागरिक

फार्मवरील कामगार हे जैवसुरक्षितता पद्धतीबाबत जागरूक असावेत.

जैवसुरक्षा अंमलबजावणीसाठी त्यांची

तयारी असावी. फार्मला भेट देणारे कामगार, नातेवाईक आणि नागरिकांची नोंद ठेवावी. त्यांना फार्मच्या कोणत्याही भागात भेट द्यावी आणि नाही द्यावी याबद्दल पूर्ण माहिती द्यावी.

फार्मवरती येणाऱ्या सर्व कामगारांनी भेटीपूर्वी व भेटीनंतर हात धुणे आवश्यक आहे.

जे कामगार जनावरांच्या सतत संपर्कात असतात, मृत जनावरे हाताळतात, गाभण जनावरे हाताळतात, अशा कामगारांनी दक्षता बाळगावी.

कामगारांना मास्क, गमबूट, रबरी हातमोजे वापरणे अनिवार्य करावे.

वाहतुकीची गाडी

फार्मवर येणाऱ्या वाहतुकीच्या गाड्या संसर्गजन्य आजारांचे जिवाणू, कीटक, तण घेऊन येत असतात. त्यांच्यावर नियंत्रण कठीण असले तरी आवश्यक आहे.

गाड्या एकाच ठिकाणी उभ्या राहतील याची दक्षता घ्यावी. गाड्यांची चाके, दर्शनीय भागावर जिवाणूनाशकाची फवारणी करावी.

जनावरे वाहतूक करणाऱ्या गाड्यांना फार्मच्या योग्य अंतरावर जागा द्यावी. गाड्यांची नोंद ठेवावी.

साहित्य व अवजारे

गोठ्यातील साहित्य, अवजारे आजारी जनावरांच्या सान्निध्यात आल्यावर बाधित होऊ शकतात. त्यापासून इतर जनावरे, माणसे बाधित होण्याची शक्यता असते.

फार्मवरील साहित्य वापरण्यापूर्वी स्वच्छ व निर्जंतुक करून घ्यावे.

आजारी व निरोगी जनावरांचे साहित्य वेगवेगळे ठेवावे.

Animal Husbandry
Animal Husbandry and Dairy Development : पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना

इतर जनावरे आणि प्राणी

मोकाट जनावरे, जंगली जनावरे, इतर पाळीव प्राणी आणि पक्षी निरधोकपणे फार्ममध्ये येत असल्यास जनावरांना आजाराची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जनावरे गोठ्यात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

खाद्य साठवणुकीची इमारत, खोली चांगल्या प्रकारे बांधावी. त्यामध्ये कीटक येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

गोठ्याला चांगले व उंच कुंपण असावे, जेणेकरून जंगली जनावरे येणार नाहीत.

एकात्मिकपणे कीटक नियंत्रण कार्यक्रम

राबवावा.

जैवसुरक्षा व्यवस्थापनामधील बाबी

फार्मची रचना

विशिष्ट रचनेमुळे फार्मवरील दैनंदिन कामकाज, लोकांचे येणे-जाणे, जंतू

प्रादुर्भाव होण्याच्या ठिकाणी नियंत्रण ठेवता येते.

फार्ममध्ये येण्याजाण्याचे ठिकाण, कामगारांची राहण्याची जागा, आजारी व नवीन जनावरे बांधण्याची जागा, खाद्य साठवण्याची जागा, मलमूत्र यांची विल्हेवाट लावण्याची जागा, पिण्याचे पाणी व इतर पाणी तसेच मृत जनावरे विल्हेवाट लावण्याची जागा निश्‍चित करावी.

जमीन त्वरित स्वच्छ करण्यायोग्य असावी. पाणी शोषून घेणारी असावी.

आजारी व नवीन जनावरे वेगळ्या मार्गाने मार्गस्थ करण्याची व्यवस्था करावी.

फार्मच्या अंतर्गत जनावरांचे विभाजन करण्यासाठी योग्य जागा सोडून कुंपण घालावे. जेणेकरून जनावरे मोकाटपणे इतरत्र फिरणार नाहीत.

खाद्य, पाणी आणि बैठक व्यवस्थापन

पौष्टिक खाद्य असावे. खाद्य हे चांगल्या प्रकार साठवून ठेवावे.

खाद्याची भांडी योग्य ठिकाणी ठेवावीत, जेणेकरून जनावरांचे मलमूत्र मिसळणार नाही.

स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी पाजावे. पाण्याची गुणवत्ता तपासून घ्यावी.

बैठक व्यवस्था असणारे ठिकाण कोरडे व स्वच्छ ठेवावे.

आरोग्य व्यवस्थापन

कोणत्याही प्रकारचे जिवाणू, विषाणू व परजीवी आजार होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

रासायनिक व भौतिक बाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

आजारीपणाच्या ठराविक चाचण्या घ्याव्यात. लसीकरण योग्य प्रकारे करावे. नोंदी ठेवाव्यात.

आकस्मिक आजार, मृत्यू यांची त्वरित दखल घ्यावी.

फार्मवरील खाद्याची भांडी, पिण्याची भांडी व इतर साहित्य आणि अवजारे स्वच्छ करून घ्यावीत. यामुळे जिवाणूंचा प्रादुर्भाव रोखता येईल.

स्वच्छतेची दैनंदिन वेळ पाळावी. विशिष्ट परिस्थितीमध्ये जंतुनाशकांचा योग्य वापर करावा.

मृत जनावरे, गाभण जनावरे, आजारी जनावरे, व्यायल्यानंतर पडलेला झार तसेच लहान जनावरांच्या जागा स्वच्छ ठेवाव्यात.

चारा आणि कुरण व्यवस्थापन

चरायला जाण्याच्या ठिकाणी परजीवींचा प्रभाव आहे का, याची खात्री करून घ्यावी.

लहान व मोठी जनावरे चरण्यासाठी एकाच ठिकाणी ठेवू नयेत.

कुरणाच्या जागी रसायन, कीटकनाशके किंवा तणनाशके फवारणी केलेली

नसावी.

- डॉ. रूपेश वाघमारे, ९७६६९४०९५४, (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com