Veterinary Research : पशुचिकित्सा संस्थेचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

Veterinary Technology : भारतीय पशुचिकित्सा संस्थेने विकसित केलेले विविध संशोधनाचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. येत्या काळात या क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांनी पुढाकार घेऊन हे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे.
Veterinary Research Institute
Veterinary Research Institute Agrowon

Pune News : भारतीय पशुचिकित्सा संस्थेने विकसित केलेले विविध संशोधनाचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. येत्या काळात या क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांनी पुढाकार घेऊन हे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल, असे मत भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्थेचे संचालक डॉ. त्रिवेदी दत्त यांनी व्यक्त केले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्थेच्या वतीने उद्योजक, शैक्षणिक संशोधनाची समन्वय बैठक शुक्रवारी (ता. १२) पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालय येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्थेचे सहसंचालक डॉ. एस. के सिंग, डॉ. रूपसी तिवारी, डॉ. पी. धर, पशुसंवर्धन विभागाचे माजी उपायुक्त डॉ. धनंजय परकाळे आदी उपस्थित होते.

Veterinary Research Institute
Veterinary Service : पशुवैद्यकीय सेवा मोफत द्या

श्री. दत्त म्हणाले की, ‘‘खासगी कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या आणि औद्योगिक क्षेत्रात ज्ञान मिळविलेल्या तज्ज्ञांना संस्थेसोबत जोडण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संस्थेने काही पदांच्या नियुक्त्या करण्याचे ठरविले आहे. जेणेकरून औद्योगिक क्षेत्रातील ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल.

याशिवाय कंपन्यांनी संस्थेने आंतरवासिता (इंटर्नशिप) विद्यार्थी घेऊन संशोधनावर भर द्यावा. हे करताना पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून करारबद्ध संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच सध्या पशूवर संशोधन करणे, शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावणे व पशुधनाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक लागणारा निधी विविध कंपन्यांनी त्यांचा सीएसआर फंड उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केले.

Veterinary Research Institute
Veterinary Clinic : मूलचा पशुवैद्यकीय दवाखाना चार महिन्यांपासून अंधारात

आयुक्त डॉ. वसेकर म्हणाले की, सध्या विभागाला सीसीपीपी या रोगाची लस अत्यंत आवश्यक आहे. ती संशोधन संस्थेने तातडीने उपलब्ध करून द्यावी. तसेच जनावरांमध्ये एचएस, बीक्यू, आरडी, थैलेरिओसीस, रेबीज या लसींच्या गुणात्मक चाचण्या करून द्याव्यात. सरकाराला लागणाऱ्या टीबी, जेडी आणि ब्रुसेला हे आजाराचे निदान करण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून द्यावेत, असे संस्थेच्या संचालकांकडे मागणी केली.

बैठकीत भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्थेच्या प्रशिक्षण व शिक्षण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. एच. पी. ऐथल यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अमोल भालेराव यांनी केले. तर संघरत्न बहिरे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com