Tree Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Green Raksha bandhan: पिंपळ वृक्षाला राखी बांधून दिला पर्यावण रक्षणाचा संदेश

Tree Conservation: गांधीनगर येथील योग साधना ग्रुपच्या महिलांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पिंपळ वृक्षाला पर्यावरणपूरक राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. कागद, कापूस आणि बियाण्यांपासून बनवलेल्या राख्यांद्वारे निसर्ग रक्षणाची प्रतिज्ञा करण्यात आली.

Team Agrowon

दिनकर गुल्हाने

Yavatmal News: भावाबहिणीच्या नात्याची वीण गुंफणारा सण म्हणजे रक्षाबंधन. भावाने बहिणीचे रक्षण करावे, हा या सणाचा अन्वयार्थ. तो मानव आणि निसर्गाच्या बाबतीतही खरा ठरावा, यासाठी योग साधना ग्रुपच्या महिलांनी पिंपळ वृक्षाला राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश दिला आहे.

श्रावण म्हणजे व्रत वैकल्याचा महिना. देवधर्म भक्ती वाढविणारा. त्याचवेळी निसर्गाची वेगळी अनुभूती देणारा. या महिन्यात येणारा रक्षाबंधनाचा सण म्हणजे भावाबहिणीच्या प्रेमाचा आनंदक्षण. बहीण भावाला राखी बांधते आणि एक प्रकारे तिच्या रक्षणाची विनवणी करते. हाच भाव निसर्गाशी जपताना येतो.

निसर्ग आपली जपणूक करतो. वृक्षवल्ली आपणासाठी सोयरे ठरते. मात्र त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. हाच भाव लक्षात घेऊन योगसाधना ग्रुपच्या महिलांनी आगळीवेगळी रक्षाबंधनाची संकल्पना राबवली. महिलांनी गांधी नगरातील बगीच्यातील पिंपळ वृक्षाला पर्यावरणपूरक राखी बांधली.

ही राखी, कागद, कापूस आणि बियाणे यापासून तयार करण्यात आली. हे तीनही घटक पर्यावरणपूरक आहेत. निसर्गाचे पर्यावरण संतुलन राखले तर नवीन पिढीला आरोग्यदायी आयुष्य मिळू शकेल, अशी भावना महिलांनी प्रकट केली.

या रक्षाबंधनानिमित्त गांधीनगर बगीच्यात महिलांनी सुगंधी फुलांची तसेच ऑक्सिजन पुरविणारी तुळशी रोपटे लावली. श्रावणातील या भावबंधन सोहळ्यात साधना ठाकरे, वैशाली ठाकरे, डॉ. माधवी गुल्हाने, पद्मजा चेपुरवार, मेघा कान्हेकर, राखी देशमुख, प्रिती व्यवहारे, सोनाली शिरभाते, मालू चव्हाण, अश्विनी चव्हाण, कल्पना सोळंके सहभागी झाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Fruit Drop: डाळिंबातील फुलगळीची कारणे काय?

Farmers Issues: दोन लाखांच्या मर्यादेमुळे फळबागधारक कर्जमाफीपासून वंचित

PM POSHAN Shakti: कागदावर पौष्टिक मेनू; प्रत्यक्षात साधी खिचडी !

Agriculture Expo: के. के. वाघ कृषी महोत्सवात फलोत्पादनाचे ‘लाईव्ह प्लॉट्स’

Chia Cultivation: पूर्व विदर्भात ‘चिया’ लागवडीला चालना

SCROLL FOR NEXT