Kharif Season 2026: मुदखेड तालुक्यातील शेंबोली परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रचंड खर्च व मेहनतीने पिकवलेली केळी अवघ्या आठ ते दहा दिवसांत काढणीस येणार होती. .मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी केळीची झाडे मोडून पडली. नांदेड जिल्ह्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. या पावसाचा फटका केळी उत्पादकांना बसला आहे. बारड परिसरातील बारड, शेंबोली, मुगटसह सुमारे सात ते दहा गावांमध्ये या वादळी पावसाचा मोठा फटका बसला..Satara Agriculture Loss: सातारा जिल्ह्यात गारपीट,वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान.सध्या बाजारात केळीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र ऐन काढणीच्या तोंडावर झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये केळीच्या बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे..Rain Damage : वादळी वाऱ्यामुळे २०० घरांची पडझड.या गंभीर परिस्थितीची माहिती शेतकऱ्यांनी तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना दिली. त्यानंतर मंडळ अधिकारी, तलाठी शंकर वच्चवार तसेच कृषी सहाय्यक सोनाली पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन केळी पिकाच्या नुकसानीची पाहणी केली..संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर केला असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत व योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.