Crop Loss Maharashtra: खरीप हंगाम २०२६ साठी परभणी जिल्ह्यातील बँकांना १ हजार ५८१ कोटी ५५ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र शुक्रवार (ता. १५) पर्यंत जिल्ह्यातील १८ पैकी ११ बँकांनी केवळ २ हजार ६२३ शेतकऱ्यांना ३६ कोटी ९० लाख ६३ हजार रुपये पीककर्ज वाटप करत २.३३ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. .जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह ३ राष्ट्रीयीकृत आणि ३ खासगी बँकांनी अद्याप पीककर्ज वाटप सुरू केलेले नाही.खरीप पेरणी तोंडावर आली असताना बियाणे, खते आदी निविष्ठांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना निधीची गरज आहे. मात्र बँकांच्या संथ गतीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत..Kharif Crop Loan: खरिप पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ६९ कोटी ९५ लाख रुपयांची वाढ.यंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयीकृत बँका, १ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, १ ग्रामीण बँक आणि ५ खासगी बँका अशा एकूण १८ बँकांना १ हजार ५८१ कोटी ५५ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २०२५-२६ मध्ये हे उद्दिष्ट १ हजार ५११ कोटी ६० लाख रुपये होते. त्या तुलनेत यंदा ६९ कोटी ९५ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे..शुक्रवार (ता. १५) पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी ८३७ कोटी २६ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी १ हजार ४८७ शेतकऱ्यांना २२ कोटी ८२ लाख १३ हजार रुपये, म्हणजेच २.७३ टक्के पीककर्ज वितरित केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ३४९ कोटी ९४ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी ६७८ शेतकऱ्यांना ८ कोटी ८० लाख रुपये, म्हणजेच २.५१ टक्के कर्ज वाटप केले. तर खासगी बँकांनी ९३ कोटी ३७ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी ४५८ शेतकऱ्यांना ५ कोटी २८ लाख ५० हजार रुपये पीककर्ज दिले..Crop Loan Distribution: खरिपासाठी ५१२ कोटींचे पीककर्ज वाटप.आजपर्यंत २ हजार ३३७ शेतकऱ्यांनी ३१ कोटी ६० लाख रुपयांच्या पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे, तर २७५ शेतकऱ्यांना ५ कोटी १६ लाख रुपयांचे नवीन पीककर्ज मंजूर करण्यात आले आहे. गेल्या वर्षी १५ मेपर्यंत ६ हजार ६५३ शेतकऱ्यांना ८१ कोटी ७२ लाख रुपये, म्हणजेच ५.१७ टक्के पीककर्ज वाटप झाले होते..परभणी जिल्हा बँक निहाय खरिप पीक कर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)बँक उद्दिष्ट वाटप रक्कम टक्केवारी शेतकरी संख्याभारतीय स्टेट बँक ५११.०२ १९.३५ ४ १२४९महाराष्ट्र ग्रामीण बँक ३४९.९४ ८.८० ३ ६७८जिल्हा सहकारी बँक ३००.९८ ०० ०० ००बँक ऑफ बडोदा ६९.८८ ०.६३ १ ४८बँक ऑफ इंडिया १३.९५ ०० ०० ००बँक ऑफ महाराष्ट्रा ७१.३६ १.७० २ ११९कॅनरा बँक ५५.९० ०.३१ १ २२.सेंट्रल बँक ऑफ इंडिया १२.६० ०० ०० ००इंडियन बँक १८.६७ ०.२२ १ १६इंडियन ओव्हरसीज बँक ११.६३ ०.२० २ १०पंजाब नॅशनल बँक ११.०६ ०.०७ १ ४युको बँक २२.१४ ०० ०० ००युनियन बँक ऑफ इंडिया ३९.०५ ०.३५ १ १९अॅक्सिस बँक ३.८० ०० ०० ००डिसीबी बँक २.१० ०० ०० ००एचडीएफसी बँक ४३.३७ ४.२८ १० ४१८आयसीआयसीआय बँक २७.९९ ०.९४ ३ ३४आयडीबीआय बँक १६.११ ०.०७ ०.०४ ६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.