Water Storage in Tulsi Dam : कोल्हापूर जिल्ह्यात यंदा दुष्काळाची स्थिती असल्याने पाटबंधारे विभागाकडून काटेकोर नियोजन केले जात आहे. दरम्यान जिल्ह्यातील लघू आणि मध्यम प्रकल्पात असणाऱ्या पाणी साठ्याची स्थिती मागच्या वेळ एवढी ठेवण्यात आली आहे.
दरम्यान पुढचे दोन महिने कडक उन्हाळा असल्याने शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील तुळशी धरणात यंदाची स्थिती समाधानकारक असल्याचे पाटबंधारे विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.
राधानगरी तालुक्यातील तुळशी धरणात गतवर्षीच्या तुलनेत पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. पाटबंधारे विभागाने पाण्यासंदर्भात काटेकर नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा पाणीपातळीत वाढ असून, ५६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, तुळशी नदीपात्रात १२५ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.
गतवर्षी तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सरासरीपेक्षा पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे पुरेशा पावसाअभावी ८८ टक्के धरण भरले होते. धरण २२ गावांना वरदायी ठरल्याने पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची मागणी सातत्याने असते.
सध्या धरणाची पाणीपातळी ६०७. ६८ मीटर आहे, तर पाणीसाठा ५५.८७५ एमक्यूएम आहे. शेतीसाठी पाण्याची वाढती मागणी आणि उन्हाची तीव्रता यामुळे बाष्पीभवनामुळे पाणीपातळीत घट होत आहे. तरीही येथील पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाने पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. सध्या धरणातून तळशी नदीपात्रात १२५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत एक मीटरने पाणीपातळी यावेळी जादा शिल्लक आहे. त्यामुळे धरणात ५६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
गतवर्षी तुळशी धरण पूर्णक्षमतेने भरलेले नव्हते. शेती व पिण्याच्या पाण्याचा विचार करून प्रशासनाने योग्य आराखडा तयार केला आहे. धरणातील पाणीसाठा जूनअखेर पुरेल याचे नियोजन केले आहे.
अंजली कारेकर, शाखा अभियंता, तुळशी धरण
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.