Water Storage : भामा आसखेडमध्ये अवघा २८.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक

Bhama Askhed Dam : खेड, शिरूर, दौंडसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात सोमवारी (दि. १५) अवघा २८.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
Bhama Askhed
Bhama Askhed Agrowon
Published on
Updated on

Pune News : खेड, शिरूर, दौंडसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात सोमवारी (दि. १५) अवघा २८.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील २७ दिवसांपासून सुरू असलेल्या आवर्तनामुळे पाणीसाठा २.०२ टीएमसी म्हणजे २६ टक्क्यांनी कमी झाला आहे. परिणामी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील पाण्यावर अवलंबून असणारी गावे, शेती मात्र पाण्यासाठी व्याकूळ झालेली पहायला मिळत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा जवळपास १७.६५ टक्क्यांनी कमी असून मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ४५.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून ८७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Bhama Askhed
Water Shortage : धुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचा भाजीपाला पिकांना फटका

धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा २.६५ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा हा २.१७ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ४५.७९ टक्के पाणीसाठा होता. कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार दुष्काळजन्य परिस्थितीमुळे २० मार्चपासून आलेगाव पागापासून पुढे असणारे ७ बंधारे भरण्यासाठी हे पाणी सोडण्यात आले असून धरणाच्या आयसीपीओमधून १००० क्यूसेस वेगाने हे पाणी सोडणे सुरू आहे. आलेगाव पागापर्यंत असणारे १८ बंधारे आणि पुढील ७ बंधारे या आवर्तनातून भरले जाणार आहे.

Bhama Askhed
Water Shortage : मराठवाड्यात उपयुक्त पाणीसाठा १८ टक्क्यांवर

पुढील काळात पिंपरी चिंचवड शहराला भामा आसखेड धरणातून २.१४ टीएमसी पाणीसाठा देण्यात येणार आहे. अजून हे पाणी देणे सुरू झाले नसल्याने धरणात सध्या पाणीसाठा दिसत आहे. परंतु हे पाणी देणे सुरू झाले तर सोडण्यात येणारी आवर्तने कमी होतील, अशी शक्यता आहे.

आगामी कडक उन्हाळ्याची चाहूल आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पाणी जपून वापरावे, असे आवाहन सहायक अभियंता (श्रेणी १) अश्विन पवार, शाखा अभियंता नीलेश घारे-देशमुख, कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com