Jowar Market : ज्वारी उत्पादकांना कोट्यवधींचा फटका

Jowar MSP : शासनाने रब्बी हंगामातील हमीभावाने खरेदीसाठी मक्याची नोंदणी सुरू केली आहे. मात्र अद्याप ज्वारीची नोंदणी सुरू झालेली नाही.
Jowar Market
Jowar MarketAgrowon

Jalgaon News : शासनाने रब्बी हंगामातील हमीभावाने खरेदीसाठी मक्याची नोंदणी सुरू केली आहे. मात्र अद्याप ज्वारीची नोंदणी सुरू झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात बाजारात ज्वारीविक्री करावी लागत आहे. यात क्विंटलमागे किमान एक हजार रुपयांचा फटका बसत असून, कोट्यवधींचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान्य खरेदीसाठी हमीभाव केंद्रे सुरू नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट सरू आहे. ज्वारीला ३१८० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असताना बाजार समित्यांत २०००-२१०० रुपये क्विंटलने ज्वारी खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे क्विंटलमागे सरासरी १००० रुपयांचे नुकसान होत आहे.

Jowar Market
Dadar Jowar : खानदेशात वाढली दादर ज्वारीची आवक

मक्याबरोबर ज्वारीची ही नोंदणी केली असती तर ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता. जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारीचा पेरा ४८ हजार ४०३ हेक्टरवर झाला आहे. उत्पादन आणि बाजारात मिळणारा भाव आणि हमीभावातील तफावत लक्षात घेतल्यास कोट्यवधींचा फटका ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

एकीकडे दुष्काळाने शेतकरी होरपळला असताना रब्बीत कष्टाने पिकविलेल्या पिकांना हमीभावापेक्षा तब्बल १ हजाराने कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला भाव आणि हमीभाव यातील तफावतीची रक्कम ही फरक म्हणून द्यावी, अशी मागणी आहे.

Jowar Market
Jowar GI Rating : ‘दगडी ज्वारी’ला भौगोलिक मानांकन

बाजारात धान्याची आवक पाहता तत्काळ हमीभाव केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. हंगाम संपल्यानंतर हमीभाव केंद्रे कोणासाठी सुरू करणार? असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी धान्य विक्री केले आहे. त्यामुळे उरलेल्या शेतकऱ्यांचा माल हमीभावात खरेदीची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. दरम्यान याबाबत मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्वारी खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यावर लगेच नोंदणी करण्यात येईल.

नेते प्रचारात

शेतकरी त्रस्त असताना दुसरीकडे नेते मात्र लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यग्र आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या ज्वारीची माती झाली असताना शेतकऱ्यांच्या मतावर निवडून येणाऱ्या नेते मात्र निवडणुकीत व्यग्र आहेत. शेतकऱ्यांना हमीभावपेक्षा हजार रुपये कमी दर मिळत असूनही त्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसल्याचे वास्तव आहे.

- जळगाव जिल्ह्यात ज्वारीचा पेरा------४८४०३ हेक्टर

ः- ज्वारीला हमीभाव-----------३१८० प्रतिक्विंटल

- ज्वारीचे अपेक्षित उत्पन्न---३२ लाख क्विंटल

- ज्वारीला मिळत असलेला दर --२०००-२१०० प्रतिक्विंटल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com