Jayakwadi Dam  Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून ३१४४ क्युसेकने विसर्ग

Water Discharge : जायकवाडी प्रकल्पातून सोमवारी (ता. ९) दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान सहा दरवाज्यांतून ३,१४४ क्युसेकने गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : तुडुंब होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या जायकवाडी प्रकल्पातून सोमवारी (ता. ९) दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान सहा दरवाज्यांतून ३,१४४ क्युसेकने गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

त्यासाठी सहाही दरवाजे ०.५ फूट उघडण्यात आले असल्याची माहिती जायकवाडी धरण (नाथसागर) नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

सोमवारी सकाळी ६ वाजता जायकवाडी प्रकल्प (नाथसागर जलाशय) ९७.३० टक्के क्षमतेने भरला आहे. १०२.७३ टीएमसी क्षमतेच्या या प्रकल्पात ७४.५९ टीएमसी जिवंत तर १००.६५ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला आहे.

सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास १५,१४४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. पाण्याची आवक बघता दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान गोदावरी नदी पात्रात ३१४४ क्युसेक विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय उजव्या कालव्यातून ५०० क्युसेकने माजलगाव प्रकल्पासाठी विसर्ग सुरू होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT