Jayakwadi Dam : जायकवाडी धरण ९७ टक्क्यांच्या पुढे गेल्याने धरण प्रशासनाकडून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या (नाथसागर) धरणातून गोदापात्रात आजपासून (ता.९) गोदापात्रात ३ हजार १४४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पाणी सोडण्यासाठी धरणाचे ०.५ फुटाने ६ दरवाजे दुपारी एकच्या सुमारास उघडण्यात आले.
धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी किंवा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन धरण कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे.
दरम्यान, यंदा जायकवाडी धरण मृत साठ्यात गेले होते. पावसाळा सुरु झाल्यानंतर सुरवातीच्या जुन, जुलै या दोन महिन्यात पावसा अभावी धरण कोरडे राहिले होते.परंतु आगस्ट महिन्यात मात्र नाशिक जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने व गोदावरीला पुर आल्यामुळे या पुराचे पाणी थेट जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले.
त्यामुळे मृत साठ्यात गेलेल्या धरणाचा पाणीसाठा जिवंत झाला व पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली. मृत साठ्यात गेलेल्या जायकवाडी धरणातुन गोदापात्रात पाणी सोडण्याचा हा प्रसंग धरणाच्या इतिहास नोंद करणारा ठरला आहे.
अतिवृष्टीने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
मराठवाड्यातील सर्वाधिक दुष्काळी बीड जिल्ह्यात मागच्या ८ दिवसांपूर्वी पावसाने अतिवृष्टीची नोंद झाली होती. आता माजलगाव धरणात २८ टक्के आणि मांजरा धरणात ७१.६६ टक्के पाणीसाठा आहे. काही दिवसांपूर्वी शुन्यावर असणारे माजलगाव धरण एका दिवसाच्या पावसात थेट १८ टक्क्यांवर गेले होते.
हिंगोली सिद्धेश्वर धरणही फुल्ल झाले असून मागच्या वर्षी ४५.९३ टक्के पाणी भरले होते. येलदरी धरण ६५ टक्के भरले असून हिंगोलीत पूर आल्यानंतर आता हिंगोलीतील दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.