Milk Production Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Production: राज्यात उन्हाळ्यामुळे दुधाच्या उत्पादनात वीस टक्के घट

Dairy Business Crisis: राज्यातील तीव्र उन्हाळ्यामुळे दुधाच्या उत्पादनात वीस टक्के घट झाली असून, चाऱ्याच्या आणि पशुखाद्यांच्या दरातही वाढ झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News: उन्हाची तीव्रता अधिक असून उष्णतेची लाट आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. उन्हामुळे नियमित दूध उत्पादनात वीस टक्के घट झाली आहे. लग्नसराई व उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आइस्क्रीम, पनीर, बटर आणि दुधाच्या पावडरलाही मागणी आहे. असे असतानाही शेतकऱ्यांच्या दुधाला मात्र पुरेसा दर मिळत नाही. उन्हाळ्यामुळे दुधात घट, चाऱ्याच्या आणि पशुखाद्याच्या दरात वाढ झालेली असताना दुधाला मात्र दर वाढलेले नसल्याने दूध उत्पादक दुहेरी कोंडीत सापडेल आहेत.

राज्यात गाईच्या दुधाचे दोन कोटी लिटरपर्यंत संकलन होते. त्यातील चाळीस टक्के दुधाचे उपपदार्थ केले जातात, तर साठ टक्के दूध पिशवीतून ग्राहकांना विकले जाते. राज्यातील दूध संकलनाचा हा आकडा सातत्याने बदलतो. प्रामुख्याने अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मराठवाडा, नाशिक आदी भागांत दुग्ध व्यवसायाला शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून प्राधान्य देत आहेत.

दुधाला पुरेसा दर मिळत नसल्याने शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या अंदोलनामुळे शासनाने मध्यंतरी प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान दिले. मात्र आता हे अनुदान बंद आहे. यंदा दरवर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस आधीच उन्हाचा चटका वाढला. सध्या उन्हाची तीव्रता अधिक असून बहुतांश भागात पाणी आणि चाराटंचाई सुरू झाली आहे.

उन्हाळ्यात एकूण दूध उत्पादनात घट होत असते. यंदा सध्याच्या स्थितीत दुधाच्या उत्पादनात वीस टक्के घट झाल्याचा दूध उत्पादक सांगत आहेत. दूध उत्पादनात घट असताना उन्हाळ्यामुळे इतर वेळीच्या तुलनेत चाऱ्याच्या दरात पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर होणारा खर्चही वाढला आहे. दुधाला मात्र ३३ रुपये, तर काही भागात ३४ रुपये प्रति लिटरला दर मिळत आहे.

लग्नसराई तसेच उन्हाळ्यामुळे आइस्क्रीम, लस्सी, ताक, पनीर, बटर आणि दूध पावडरला मागणी आहे. चांगली मागणी असूनही दुधाच्या दरात मात्र वाढ झाली नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीत दूध उत्पादक शेतकरी दुहेरी कोंडीत सापडले आहेत. सध्या मिळणारा दर आणि उत्पादनावर होणारा खर्च पाहता दुधाचा धंदा प्रचंड अडचणीत असताना सरकारी पातळीवर मात्र याबाबत गांभिर्याने घेतले जात नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. दुग्धव्यवसाय अडचणीत असताना शेतकरी नेतेही दुग्ध व्यवसायाबाबत गप्प असल्याचे दूध उत्पादकांचे म्हणणे आहे.

सध्याचे पशुखाद्याचे दर

वालीस : १३०० ते १३५० (५० किलो)

सरकी पेंड : २६५० ते २७०० (७० किलो)

शेंगदाणा पेंड : २४५० ते २५०० (५० किलो)

गोळी पेंड : १६५० ते १७०० (५० किलो)

चाऱ्याचे दर

ओला चारा (मका, कडवळ, ऊस) : ३४०० ते ३५०० (प्रति टन)

सुका चारा (कडबा, भुसा) : ९ ते १० रुपये प्रति किलो

दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यामुळे चाऱ्याचे दर वाढलले आहेत. यंदा पशुखाद्याचे दरही वाढले आहेत. शिवाय एकूण दूध उत्पदनात २० टक्के तूट आहे. एकतर उत्पादनात तूट, चारा, पशुखाद्याचे दर वाढलेले असताना त्या तुलनेत दुधाला दर मिळत नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आहे. सध्या मागणी असूनही दर मिळत नाही हे न उलगडणारे कोडे आहे.
नंदू रोकडे, दूध उत्पादक शेतकरी, खडकी ता. जि. अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT