निखिल मेस्त्री Palghar News: मुंबई-पालघरदरम्यानचा प्रवास वेगवान व सुलभ, तसेच वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यासाठी उत्तन-विरार सागरी सेतू उभारण्यात येणार आहे. उत्तर मुंबई, ठाणे, पालघर परिसराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी हा सेतू महत्त्वपूर्ण ठरणार आहे. किनारपट्टी भागातील संपर्क सुलभ करण्यासाठी प्रस्तावित सेतू प्रकल्प महत्त्वाचा आहे. या सेतूमुळे मुंबईकडे जाणारा प्रवास वेळ व अंतर दोन्ही कमी होणार आहे. विरार, नालासोपारा, वसई, भाईंदर व उत्तन परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच ३४,३७५ काेटींची बचत होणार आहे..पालघर जिल्हा दक्षिण मुंबई-पश्चिम उपनगरांबरोबर या प्रकल्पामुळे थेट जोडला जाणार आहे. त्यामुळे पर्यटन, मत्स्य उद्योग आणि स्थानिक व्यापाराला बळ मिळणार आहे. या प्रकल्पासाठी ७२ टक्के निधी जपानच्या ‘जिका’कडून उपलब्ध होणार असून उर्वरित २८ टक्के निधी राज्य सरकारकडून उपलब्ध केला जाणार आहे. उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाल्याने मुंबईपासून पालघरपर्यंतचा प्रवास आता जलद, सोपा आणि सुरक्षित होणार आहे. उत्तनपासून विरारपर्यंत सुमारे ५५.१२ किमी लांबीचा हा प्रकल्प आहे, ज्यामध्ये सागरी पूल आणि जोड रस्त्यांचा समावेश आहे..International Sea World Aquarium Abu Dhabi : अबूधाबी येथील आंतरराष्ट्रीय ‘सी वर्ल्ड’ मत्स्यालय.ठळक वैशिष्ट्ये८७,४२७ काेटी आधीचा प्रस्ताव५२,६५२ काेटी आता खर्च३४,३७५ काेटी बचत.Sea Ecosystem : कांदळवनांचे निसर्गाला होणारे फायदे .२४.३५ किमी सागरी सेतू लांबी९.३२ किमी उत्तन जोडरस्ता२.५ किमी वसई जोडरस्ता.मालवाहतुकीला गतीउत्तन-विरार सागरी मार्ग हा प्रकल्पाच्या विरार कनेक्टरमार्फत हा सेतू बडोदा-मुंबई एक्स्प्रेस-वेशी थेट जोडला जाणार आहे, ज्यामुळे उत्तर उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मार्ग अधिक जलद व कार्यक्षम होणार आहे. हा प्रकल्प भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टिकोनाला महत्त्वाची साथ देणारा ठरणार आहे..बंदर विकास, सुनियोजित प्रवास, अशा दळणवळण उद्देशाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल. महानगराला जोडणारा हा दुवा रोजगारासह आर्थिक संधी निर्माण करणारा आहे. मुंबई व ‘एमएमआर’ला जागतिक स्पर्धेत सक्षम बनविण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.- डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.