Latur News: लातूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यात सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. लातूर जिल्ह्यात पंधरा. तर धाराशिव जिल्ह्यात ३२ केंद्रांवर शनिवारपासून (ता. १५) सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू होणार आहे. हमीभावाने सोयबीन विक्रीसाठी लातूर जिल्ह्यात ३१ हजार, तर धाराशिव जिल्ह्यात बारा हजार आठशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या बारा दिवसांपासून ही नोंदणी सुरू होती. डिसेंबरअखेर ही नोंदणी सुरू राहणार आहे. हमीभाव केंद्र सुरू होण्यापूर्वीच भाव वाढल्याने केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी येणार का, असाही प्रश्न प्रशासनाला सतावत आहे..यंदा अतिवृष्टी व पुराच्या तावडीतून वाचवलेल्या सोयाबीनला चांगला भाव देण्यासाठी राज्य सरकारने लवकरच सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी कमी भाव बाजारात सोयाबीनची विक्री थांबवून खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा सुरू केली आहे. यामुळे बाजारात व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे भाव वाढविण्यास सुरुवात केली आहे..Soybean MSP: उपबाजारपेठ तिर्थपुरीत शनिवारपासून सुरू होणार सोयाबीन हमीभाव केंद्र.या वर्षी सोयाबीनला पाच हजार ३२८ रुपये क्विंटल असून, बाजारात पाच हजार रुपयाच्या पुढे भाव मिळाल्यास शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी जाणार नसल्याची स्थिती आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्केटिंग फेडरेशनकडून तीन लाख ७५ हजार क्विटंल तर कृषी उत्पादक कंपन्यांकडून ७५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली होती. यावरून या वर्षी साडेपाच लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आहे..जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनची वीस, पणन मंडळाची म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपन्यांची आठ तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची चार खरेदी केंद्र आहेत. बारा दिवसात बारा हजार आठशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून या शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी शुक्रवारी मेसेज पाठवून शनिवारपासून प्रत्यक्षात खरेदीला सुरवात करण्यात येणार आहे. खरेदीसाठी पुरेशा बारदाना असून सर्व केंद्रावर तो उपलब्ध करण्यात आल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज बाजपेयी यांनी सांगितले. .Soybean MSP Procurement: नोंदणी करताना बायोमेट्रिकचा खोडा.लातूर जिल्ह्यात मागील बारा दिवसांत ३१ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनची पंधरा केंद्र असून शेतकरी उत्पादक कंपन्या व अन्य यंत्रणांच्या खरेदी केंद्राची माहिती पुढे आलेली नाही. राज्यात ३० ऑक्टोबरपासून सोयाबीनच्या खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात करण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. मात्र संबंधित एजन्सीच्या कोड ऍक्टिवेशनची व इतर तांत्रिक प्रक्रिया वेळेवर पूर्ण झाली नाही. त्यामुळे केंद्र दिलेल्या वेळेवर सुरू झाली नाहीत. .तांत्रिक कारणामुळे नोंदणीला ब्रेक बसल्याने शेतकऱ्यांत संभ्रम होता. या प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी बराच वेळ लागला. त्यानंतर दोन नोव्हेंबरपासून सुरळीतपणे ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. यात केंद्राऐवजी स्वतः नोंदणी केलेल्या सात ते नऊ हजार शेतकरी अजून अॅड झालेले नाहीत. केंद्रावरून त्यांना अॅप्रूव्हल दिले की अॅड होतील. मात्र अजून अॅडचे ऑप्शन आले नाही. लवकरच ते येईल, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी नंदकुमार खोडसे यांनी सांगितले. .आवक वाढताच भाव कमी लातूरच्या बाजारात शुक्रवारी सोयाबीनला चार हजार ९५० रुपये विक्रमी भाव मिळाला होता. आवक वाढवण्यासाठी भाववाढीचे प्रयत्न शनिवारी यशस्वी झाल्याचे दिसले. बाजारात २३ हजार १८० क्विंटल आवक झाली. मात्र, आवक वाढताच भाव कमी झाले. शनिवारी सोयाबीनला कमाल चार हजार ८५१, किमान चार हजार २०० तर सर्वसाधारण चार हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता..सोयाबीनच्या खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीला इतर जिल्ह्याच्या तुलनेत लातूरला चांगला प्रतिसाद आहे. नोंदणीत सध्या कुठल्याही तांत्रिक अडचणी नाहीत. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनीही नोंदणी करावी. नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर मेसेज आल्यानंतर लगेचच केंद्रावर सोयाबीन आणावे. यंदा खरेदीचे उद्दिष्ट अजून आलेले नाही. त्यामुळे जेवढे येईल, तेवढ्या सोयाबीनची खरेदी होईल. - नंदकुमार खोडसे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी शुक्रवारी (ता. १४) जातील. केंद्रावर प्रथम येणाऱ्यांची प्रथम खरेदी केली जाईल.नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोटांचा ठसा (थंब) द्यावा लागेल. ज्येष्ठ व बाहेरगावी असलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पोर्टलवर नॉमिनीची सुविधा दिली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या ऐवजी या नॉमिनीला आधार कार्ड देऊन सोयाबीन विक्री करता येईल. सात दिवसाच्या आत सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील. - मनोज बाजपायी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, धाराशिव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.