Milk Production : सांगली जिल्ह्यात २२ हजार लिटरने दूध उत्पादन घटले

Dairy Production : जानेवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात २२ हजार ७६९ लिटरने दैनंदिन दुधाचे उत्पादन घटले आहे.
Milk Production
Milk ProductionAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात वाढती उष्णता, काही अंशी चाराटंचाई व पाणीटंचाईमुळे दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात २२ हजार ७६९ लिटरने दैनंदिन दुधाचे उत्पादन घटले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात दूध उत्पादनात घट होण्याचा अंदाज जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात सहकारी १७, तर खासगी ७ दूध संघ आहेत. जिल्ह्यात दररोज सुमारे १६ लाख लिटर दूध संकलन होते. यापैकी ५० टक्के पिशवीबंद दुधाची विक्री होते. उर्वरित दुधाची राज्यभरात, तसेच मोठ्या शहरांत निर्यात होते. दूध पावडर व बटर या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठीही वापर होतो.

Milk Production
Milk Aduteration Test: दूध भेसळ ओळखण्याच्या चाचण्या

पावसाळ्याच्या चार महिन्यांत हिरवा चारा उपलब्ध असल्याने १० ते १५ टक्के उत्पादन वाढते. मात्र उन्हाळ्यात उत्पादन घटल्याचे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते. या वर्षी जानेवारी, जानेवारी महिन्यात सहकारी दूध संघाकडे २ लाख ७५ हजार ०३१, मल्टिस्टेट संस्थाकडे २ लाख ०३ हजार २६१, तर खासगी दूध संघाकडे १० लाख ७६ हजार ९२९ असे एकूण १५ लाख ५५ हजार २२१ लिटर दुधाचे दैनंदिन संकलन झाले.

सध्या जनावरांना चारा उपलब्ध असला तरी, जानेवारी महिन्यापासून उष्णता वाढली आहे. त्यातच उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे दूध उत्पादनात घट होत असल्याचे चित्र आहे. नदीकाठावरील चार तालुक्यांत मोठ्या संख्येने दुभती जनावरे व दुधाचा व्यवसाय आहे.

Milk Production
Milk Adulteration Committee: दूध भेसळ रोखण्यासाठी समिती स्थापन

मार्च महिन्यात सहकारी दूध संघाकडे २ लाख ५२ हजार ५९७, मल्टिस्टेट संस्थाकडे २ लाख ४९३ तर खासगी दूध संघाकडे १० लाख ७९ हजार ३३५ असे एकूण १५ लाख ३२ हजार ४२५ लिटर दूधाचे दैनंदिन संकलन झाले.

अर्थात, एका महिन्यात २२ हजार २२ हजार ७६९ लिटर दुधाचे उत्पादन घटले असल्याचे चित्र आहे. दैनंदिन उत्पादनापैकी ६० टक्के दूध गायीचे आहे. यावर्षी तीव्र उन्हाचा परिणाम चाऱ्यावर व दूध उत्पादनावर झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com