Milk Production: दूध उत्पादन वाढीसाठी व्यावसायिक दृष्टिकोन गरजेचा!

Dairy Farming: भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये दूध उत्पादनाचा खर्च निम्म्याने कमी आहे, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय अधिक नफा देणारा ठरतो. भारतीय शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून अधिक दूध मिळवण्यावर भर द्यायला हवा. आधुनिक तंत्रज्ञान, जनावरांची डीएनए चाचणी आणि वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केल्यास दूध व्यवसाय अधिक फायदेशीर ठरू शकतो.
Smart dairy farming
Smart dairy farmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. चेतन नरके

Modern Agriculture Technology: ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या देशांच्या तुलनेत आपल्याकडील दूध व्यवसायात फारशी व्यावसायिकता दिसत नाही. आपल्याकडे अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या या व्यवसायात खूप आहे. आगामी काळात तुकडीकरणामुळे जमीनधारणा आणखी कमी होत जाणार आहे.

त्यानुसार शेतकऱ्यांनी नियोजन करण्याची गरज आहे. आपल्याकडील प्रतिलिटर दूध उत्पादनाचा खर्च आणि दुधाला मिळणारा भाव याचा ताळमेळ बसवताना सगळ्यांचीच कसरत होते.

Smart dairy farming
Agriculture Technology: संत्रा बागायतदारांना उपलब्ध होणार स्पेनचे वाण

त्यासाठी उत्पादन खर्च कमी करून दूध उत्पादन वाढीकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष दिले पाहिजे. आपल्याकडील गाय दुधाचा उत्पादन खर्च आणि परदेशातील उत्पादन खर्च यात मोठी तफावत आहे. भारतात गाय दुधासाठी प्रति लिटर २५ रुपये उत्पादन खर्च येतो आणि किमान भाव सरासरी ३० रुपये मिळतो.

Smart dairy farming
Agriculture Technology: उत्तम मुरघास निर्मितीसाठी यंत्रे

त्याच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये गाय दूध उत्पादनाचा प्रतिलिटर खर्च हा १२ रुपयांपर्यंत येतो. आपल्यापेक्षा निम्मा खर्चात दुधाचे उत्पादन होत असल्याने तेथे दूध व्यवसाय किफायतशीर ठरला आहे. जनावरांची संख्या वाढवून दूध उत्पादन वाढवण्यापेक्षा कमी जनावरांमध्ये अधिक दूध उत्पादन हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे. त्यासाठी जनावरांची डीएनए चाचणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

बांगलादेशात उपलब्ध असलेले तंत्रज्ञान लवकरात लवकर भारतात यावे, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात मी लवकरच केंद्रीय दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंग यांची भेट घेणार आहे. हे संशोधन आपल्या देशातील शेतकरी व दूध व्यवसायासाठी वरदान ठरेल, असा मला विश्वास आहे.

(लेखक इंडियन डेअरी असोसिएशनचे सदस्य आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com