Drought  Agrowon
ॲग्रो विशेष

Satara Drought Situation : एकीकडे पाऊस, तर दुसरीकडे टँकरच्या फेऱ्याच; टेंभूचे आवर्तनही बंद

Monsoon Satara : राज्यासह सातारा जिल्ह्याच्या काही भागात मॉन्सून सुरू झाला आहे. पण म्हणावा तसा काही सक्रीय झालेला नाही. त्यामुळे अद्यात जिल्ह्यात टँकरनेच सर्वसामान्यांना तहान भागवावी लागत आहे. टेंभूचे आवर्तनही बंद झाले आहे. तर पाऊस नसल्याने खरीप पेरणी खोळंबली आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : साताऱ्यासह राज्याच्या विविध भागात मॉन्सूनचा पाऊस होत आहे. तसाच साताऱ्याच्या माण तालुक्यात देखील मुसळधार पाऊस होत आहे. मात्र तालुक्यातील काही गावात अद्यात पाऊस झाला नसल्याने अद्याप गावकऱ्यांच्या घशाला कोरड तशीच आहे. तालुक्यातील २३ गावे आणि १६५ वाड्यांवर अद्याप टँकर सुरूच आहेत. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने टेंभूचे आवर्तनही बंद करण्यात आले आहे. मात्र याच योजनेमुळे ऐन दुष्काळात देखील शेतीला पाणी मिळाल्याने शेतकरी खुश आहे. मात्र आता पावाससह योजनेचे पाणी नसल्याने खरीपाची कामे खोळंबली आहेत. 

सातारा जिल्ह्यातील तालुक्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला असून काही भाग तसाच कोरडाच आहे. काही गावांमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने २३ गावांना सध्या पाण्याचे टँकर सुरू आहेत.  तर याआधी येथे ८५ टँकर धावत होते. मात्र काही गावांमध्ये पाऊस झाल्याने टँकरची संख्या कमी झाली आहे. तर सव्वालाखाच्या आसपास लोक पाणीटंचाईने बाधीत झाले आहेत. मात्र आता ५ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने पाणीच पाणी झाले आहे. जेथे हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. त्या गावांमध्ये आज मुबलक पाणी आहे. 

१६ टँकरचा पाणीपुरवठा

मात्र तलुक्यातील काही मंडलात अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याने काही गावांसह वाड्यावस्त्यांना १६ खासगी टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा सुरू आहे. येथे २३ गावे १६५ वाड्यावस्त्यांमधील ५३,१०० लोकसंख्येला ४६ खेपांच्या माध्यमातून १६ टँकर पाणीपुरवठा करत आहेत. येथे दहालाख लीटर पाणी पुरवले जात आहे. 

या गावात सुरू टँकर 

इंजबाव, भालवडी, हिंगणी, राणंद, मार्डी, पिंपरी, डंगिरेवाडी, पळशी, मोही, कारखेल, वरकुटे-म्हसवड, हवालदारवाडी, संभूखेड, पर्यंती, वाकी, जाशी, खडकी, भाटकी, रांजणी, शेवरी, पांगरी, परकंदी, वडगाव ही गावे व त्याअंतर्गत येणाऱ्या वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत.

टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन 

दरम्यान २६ डिसेंबर २०२३ रोजी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी सुरू केलेली टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन मंगळवारी (ता.१७) बंद करण्यात आले. या योजनेचे पाणी येथे ५ महिने २२ दिवस सुरू होते. जे आता पाऊस पडल्याने बंद करण्यात आली. तर आतापर्यंत या योजनेसाठी कृष्णा नदीतून १३.५० टीएमसी पाण्याची उचलण्यात आली आहे. 

२१७ गावांचा शेती व पाण्याचा प्रश्न

टेंभू सिंचन योजनेच्या आवर्तनामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील २१७ गावातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तर माण पट्ट्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. त्यामुळे ही योजना माण पट्ट्यासाठी उपयुक्त ठरली आहे. 

खरीप पेरण्यांची लगबग 

सध्या जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने फलटण तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज झाला असून खरीप पेरण्यांची लगबग सुरू आहे. मात्र काही कृषी सेवा केंद्र दुकानदारांकडून बियाण्यांची विक्री चढ्या दराने केली जात आहे. तर कृत्रिम तुटवडा देखील निर्माण केला जात आहे. यावरून कृषी विभागाने भरारी पथकांची निर्मिती केली आहे. तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २० हजार ४०८ हेक्टर असून यंदा १७ हजार ७२६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होईल असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT