Latur News: डबल एस बारदान्यातून येणाऱ्या शेतीमालाची उचल करण्यावरून येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात हमालांनी २७ नोव्हेंबर रोजी अचानक संप पुकारला. डबल एस बारदानातून आलेल्या शेतीमालाचे पोते जास्त वजनदार असल्याची तक्रार करता हमालांनी ही भूमिका घेतली. बाजार समितीच्या प्रयत्नांतर तीन दिवस मार्ग निघाला नाही. यामुळे तीन दिवस शेतीमालाचा सौदा निघाला नाही. रविवारी (ता. ३०) बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांनी बारदान्याची ही कोंडी सोडविली व बाजार सोमवारपासून (ता. एक) पुर्ववत सुरू झाला. या स्थितीत शेतीमालाची आवक घटली आहे..शेतीमाल वाहतुकीसाठी पूर्वी एक क्विंटलचा बारदाना (पोते) होते. अडत बाजारात शेतकरी एका पोत्यात १३५ किलोपर्यंतचा शेतीमाल घेऊन यायचे. मात्र काळानुरूप त्यात घट होऊन कट्ट्याचा बारदाना आला. कट्ट्यात पन्नास किलोपर्यंत शेतीमाल भरत असला, तरी त्याहून अधिक शेतीमाल बसवण्याची तळमळ शेतकऱ्यांची असते. शेती व्यवसायात शेतीमालाच्या मळणी व वाहतुकीचे दर हे वजनावर नव्हे तर कट्ट्यावर आकारले जातात. यामुळे कट्ट्यात जास्तीत जास्त शेतीमाल भरून मळणी व वाहतुकीच्या खर्चात बचत करण्याची धडपड शेतकरी करत असतात..Soybean Market : सोयाबीनच्या हमीभावाला बारदान्याची अडचण.या शेतकऱ्यांच्या या धडपडीला डबल एस बारदाना पूरक ठरू लागला. शेतकऱ्यांची तळमळ यशस्वी होत असतानाच अडत बाजारातील हमालांनी या बारदान्याला विरोध करत तब्बल तीन दिवस बंद पाळला. हमालांनी डबल एस बारदान्यातून आलेल्या शेतीमालाची उचल करण्यास नकार दिला. पन्नास किलोच्या पोत्यातून आलेल्या शेतीमालाची उचल करण्यावर हमाल मंडळी ठाम होते. लातूर वगळता जिल्ह्यातील अन्य अडत बाजारात हा प्रश्न नव्हता. त्या बाजारात हमाल मंडळी डबल एस बारदान्यातून शेतीमालाची उचल करत होते. लातूरच्या हमालांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेती व्यवसायात दूरगामी परिणाम होणार होते..Cotton Farmers Crisis: कापूस उत्पादकांची कोंडी.शेतकऱ्यांना हमालीसोबत मळणी व वाहतुकीसाठीही जास्त पैसे मोजावे लागणार होते. हमालांचा विरोध शेतकऱ्यांच्या शेतीखर्चातील बचतीवर आघात करणार होता. यामुळे बाजार समितीची कोंडी झाली. अनेक कारणांनी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेताना हमालांच्या पाठीवर नकळत वाढणाऱ्या ओझ्याकडेही लक्ष देण्याची गरज होती. या विचित्र कोंडीतून सभापती बावणे यांनी कौशल्याने मार्ग काढला..व्यापारी असोसिएशन व सर्व हमाल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. चार दिवस त्यांनी केलेल्या शिष्टाईला यश आले व हमालांनी संप मागे घेतला. यामुळे सोमवारपासून बाजार पूर्ववत सुरू झाला. या स्थितीत आवक मात्र कमी झाली आहे. सोमवारी सोयाबीनची १५ हजार २५३ होती तर अन्य शेतीमालाची आवक दोन हजार क्विंटलच्या आतच होती. मंगळवारीही (ता. दोन) ही आवक वाढली नाही. मंगळवारी सोयाबीनची आवक सात हजार २११ क्विंटल, तर अन्य शेतीमालाची आवक एक हजार ५३९ होती. बुधवारीही (ता. तीन) आवक मंदावलेलीच होती..लातूर बाजार समितीच्या अडत बाजारात हमालांच्या विविध संघटना आहे. या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली व त्यांना शेतकऱ्यांची अडचण लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बाजारात डबल एस बारदान्यातून शेतीमाल येईपर्यंत त्याची उचल करण्याबाबत संघटनांनी बाजार समितीला लेखी दिले. यामुळे बाजार पूर्ववत सुरू झाला.- जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती, लातूर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.