Drought situation in Kolhapur : पाणीदार कोल्हापुरला दुष्काळाच्या झळा, आजरा तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा

Ajara Kolhapur Drought : हातकणंगले आणि गडहिग्लज तालुक्यात दुष्काळा जाहीर केला आहे. दरम्यान आजरा तालुक्यातही वाड्या आणि २६ गावांत पाणीटंचाईची भासत आहे.
Drought situation in Kolhapur
Drought situation in Kolhapuragrowon

Drought Condition Kolhapur : यंदा मॉन्सून पावसाने हुलकावणी दिल्याने कोल्हापूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिग्लज तालुक्यात दुष्काळा जाहीर केला आहे. दरम्यान आजरा तालुक्यातही वाड्या आणि २६ गावांत पाणीटंचाईची भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.

पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जानेवारी ते मार्चपर्यंतचा संबंधित वाड्या व गावांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला असून, कूपनलिका व विहीर अधिग्रहण या उपाययोजना सुचवल्या आहेत. आजरा तालुक्यात सर्वाधिक पाऊस होतो परंतु साठवणुकीसाठी पुरेसे बंधारे नसल्याने नद्या आतापासूनच कोरड्या पडत चालल्या आहेत.

वाटंगीपैकी मोरेवाडी व मोरेवाडी धनगरवाडा या दोन वाड्यांवर ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून एक दिवस आड पाणी मिळत आहे. वाड्यांसाठी कूपनलिकेचा प्रस्ताव टंचाई आराखड्यात सुचवला आहे. चितळेपैकी जेऊर, मुमेवाडी, वझरे, वाटंगी, मलिने, चव्हाणवाडी, चितळे, चितळेपैकी भावेवाडी, शृंगारवाडी, हाळोली, हाळोलीपैकी दर्डेवाडी.

किणे, किणेपैकी चाळोबावाडी, महागोंड, महागोंडपैकी महागोंडवाडी, शृंगारवाडी उचंगी पैकी हुडा, कोवाडे पैकी दाभेवाडी, आरदाळ, चाफवडे, मलिप्रे पैकी कागीनवाडी, चितळे पैकी धनगरवाडा, वझरे पैकी घागरवाडी, हरपवडे, शेळप, पारपोली, पारपोलीपैकी खेडगे या गावामध्ये फेबुवारीनंतर पाणीटंचाईची शक्यता आहे.

Drought situation in Kolhapur
Drought In Maharashtra: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सवलतीचा दिलासा तर नाही, उलट महसूल करवसूलीचा धोशा!

या गावामध्ये विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव आहे. गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी आतापासून विविध उपाय योजना केल्या जात आहेत.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन

संभावीत पाणीटंचाई लक्षात घेता पंचायत समिती प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. ग्रामपंचायत स्तरावर याबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळांना मीटर लावण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासन आग्रही आहे. पाणी वापरण्याबाबत ग्रामस्थात जनजागृती करण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com