Drought Maharashtra : शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन वेगळ्या दुनियेत व्यस्त : वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

Assembly Opposition Leader Vijay Wadettiwar : राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी काँग्रेसकडून समित्यांची स्थापना करण्यात आली होती. या समित्यांकडून पाहणी दौरे सुरू झाले असून समित्या अहवाल राज्य सरकार आणि काँग्रेस कमिटीला देतील.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarAgrowon

Pune News : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि अवकाळीसह वळवाच्या पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान केले. मात्र यावर राज्य सरकारचे लक्ष नाही. यावरून काँग्रेसकडून राज्यातील दुष्काळी पट्ट्यांची पाहणी स्थापन केलेल्या समित्यांमार्फत केली जात आहे. त्याचा अहवाल समित्या राज्य सरकार आणि काँग्रेस कमिटीला देणार आहे. याबाबत शनिवारी (ता.१) विदर्भ समितीची बैठक पार पडली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 

राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्या दुनियेत व्यस्त असल्याची तिखट टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून अजून मिळालेली नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेसने दुष्काळ संदर्भात विदर्भ समिती केल्याचे वडेट्टीवार म्हणाले. या बैठकीला आमदार विकास ठाकरे, आमदार रणजित कांबळे, आमदार सहसराम कोरोटे, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, समन्वयक अतुल कोटेचा उपस्थित होते.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : कापूस, कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकरीच सरकारची मस्ती उतरवतील : वडेट्टीवार

तसेच विदर्भात ५ जून पासून समितीकडून पाहणी दौरा केला जाणार असून त्याचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला दिला जाईल. तर शेतकऱ्यांसाठी भरीव, ठोस मदत देण्याची मागणी देखील केली जाईल अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. 

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री बाहेर फिरत आहेत. याचदरम्यान आयुक्तांची बदली होते. कृषी विभागाला पूर्णवेळ सचिव नसून खरीप हंगाम तोंडावर बैठक होत नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्यात एकीकडे खतांचा तुडवडा, बियाणाचे दर वाढले असून बियाणांसाठी शेतकऱ्यांना लोक रांगेत उभं राहावं लागत आहे. यावर उपाय योजना करण्याऐवजी सत्ताधारी परदेशात मौज मजा मारत आहेत, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले.

राज्यातील शेतकरी जगला काय आणि मेला काय महायुती सरकारला काही फरक पडत नाही. यातूनच महायुती सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली अनास्था दिसून येत असल्याची टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेते गायब झाले असून शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकार करत नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com