Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation in Maharashtra : उन्हाळ कांदा लागवड लांबणीवर

Summer Onion : जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात विशेषतः बागलाण व कळवण तालुक्यात रब्बी हंगामात प्रमुख नगदी उन्हाळ कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यातील कांद्याचे आगर समजल्या जाणाऱ्या बागलाण तालुक्यातील पश्चिमेकडील भागात नोव्हेंबर पासून सर्वत्र उन्हाळी कांदा लागवडीची धावपळ सुरू असताना मॉन्सूत्तोत्तर पावसाने हजेरी लावल्याने शेतात चिखल व लागवडीसाठी तयार केलेल्या सरी आणि वाफे सपाट झाल्याने उन्हाळी कांदा लागवड लांबणीवर पडली असून शेतकऱ्यांना शेतीच्या दुबार मशागतीसाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

यावेळी कांदा लागवड ते साठवणुकीचे सर्व नियोजन कोलमडणार आहे. जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात विशेषतः बागलाण व कळवण तालुक्यात रब्बी हंगामात प्रमुख नगदी उन्हाळ कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन थंडीच्या दिवसात लागवड तसेच मॉन्सूनपूर्व वळीव पावसाच्या आगमनापूर्वी पिकविलेला शेतातील कांदा चाळीत सुरक्षितपणे साठविण्याच्या दृष्टीने खरिपातील पिकांच्या काढणीनंतर नियोजनाप्रमाणे उन्हाळ कांदा बीची पेरणी करण्यात आली.

परंतु, परतीच्या पावसामुळे रोपे पूर्णपणे नष्ट झाली. त्यामुळे दुबार बी पेरणी करून ढगाळ व रोगट हवामानात महागडी बुरशीनाशके व कीडनाशकांची फवारणी करीत रोपवाटिका तयार करून शेतीची मशागत करून सरी वाफे तयार करून वेळेत कांदा लागवड सुरू केली.

लागवड, साठवणुकीचे नियोजन कोलमडणार

सध्याच्या वातावरणात कडक ऊन पडतं नसल्याने कांदा लागवड लांबणीवर पडली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदा लागवड ते साठवणूकीपर्यंतचे सर्व नियोजन कोलमडले आहे. तसेच चालू वर्षी कांदा बी पेरणी व अवकाळी पावसामुळे शेतीच्या दुबार मशागतीच्या आर्थिक फटका व सर्व शेतकऱ्यांची लागवड एकाच वेळी येणार असल्याने मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT