Onion Cultivation : उन्हाळ कांदा लागवड चोपडा भागात अधिक

Summer Onion : खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील कांद्याची लागवड या आठवड्यात सुरू झाली आहे.
Onion Cultivation
Onion Cultivation Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील कांद्याची लागवड या आठवड्यात सुरू झाली आहे. लागवडीत जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका आघाडीवर असल्याचे चित्र आहे. लागवड मागील दोन-तीन दिवसांपासून सुरूच आहे. यंदा लागवड वाढेल, असे संकेत सुरुवातीपासून होते. कारण पाऊसमान चांगले राहिले आहे.

धुळे जिल्हा उन्हाळ कांद्या लागवडीत आघाडीवर असतो. परंतु यंदा धुळ्यातील लागवड फारशी सुरू नाही. चांगल्या पावसामुळे धुळ्यातील साक्री, धुळे भागांत लागवडीत मोठी वाढ होणार आहे. कांद्याचे दर टिकून आहेत. मागील उन्हाळ हंगामात शेतकऱ्यांच्या शेतात कांदा काढणी सुरू होताच दर कमी झाले.

Onion Cultivation
Onion Cultivation : उन्हाळ कांद्याची यंदा ‘रेकाॅर्डब्रेक’ लागवड

याचाही परिणाम कांदा लागवडीवर होईल, अशी स्थिती होती. परंतु कांदा लागवड पाऊसमान व सध्याचे दर यामुळे वाढत आहे. खानदेशात उन्हाळ कांद्याची लागवड १२ ते १३ हजार हेक्टरवर होईल. यंदा सुमारे दीड ते दोन हजार हेक्टरने लागवड क्षेत्र वाढेल, असे संकेत आहेत.

एकट्या धुळ्यातील लागवड पाच हजार हेक्टर राहू असते. धुळ्यातील लागवडीला सुरुवात नाही. कारण अनेकांनी रोपवाटिका उशिरा तयार केल्या. मागील वेळेस धुळ्यात दुष्काळाने कांदा लागवडीस मोठा फटका बसला होता.

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, अमळनेर, धरणगाव या भागांत लागवड वाढणार असल्याचे चित्र आहे. चोपडा, यावल या भागातील लागवड स्थिर राहणार आहे. नंदुरबारमध्ये शहादा, नवापूर, नंदुरबार तालुक्यात कांदा पीक आहे. तेथेही लागवड फारशी सुरू नाही.

सध्या चोपडा, चाळीसगाव भागात खानदेशात लागवड सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील लागवड दीड ते दोन हजार हेक्टरपर्यंत असणार आहे. उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी शेतकरी लाल कांदा वाणास पसंती देत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी करार शेतीअंतर्गत पांढऱ्या कांद्याची लागवड केली आहे. पांढऱ्या कांद्याची लागवड धुळे, जळगाव व नंदुरबारमध्येही होत आहे.

Onion Cultivation
Onion Cultivation : कांदा लागवडीत मजूरटंचाई, रोपांचा तुटवडा

सध्या आगाप रब्बी कांद्याची लागवड सुरू आहे. यासाठी शेतकरी कमी कालावधीच्या वाणांना पसंती देत आहेत. कांदा लागवडीसंबंधी शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातच रोपवाटिका तयार केल्या होत्या. तसेच काहींनी व्यावसायिक रोपवाटिका तयार केल्या असून, त्यातील रोपांनाही उठाव आहे. रोपांची पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसात पुनर्लागवड केली जाते. काही शेतकरी रोपांची शेतकरी विक्री करून बियाण्यांवरील खर्च काढून घेतात.

मजुरी दर कायम

कांदा लागवडीसाठी यंदा एकरी साडेतीन हजार रुपये मजुरी येत आहे. ही मजुरी यंदा वाढलेली नाही. सध्या मजुरी स्थिर आहे. कमाल शेतकरी पाट पद्धतीने सिंचन करून लागवड करून घेत आहेत. तर काहींनी गादीवाफा पद्धतीने ठिबकच्या माध्यमातून सिंचन करून लागवड केली आहे. एका गादीवाफ्यावर दोन लॅटरल सिंचनासाठी आहेत.

अडावद आघाडीवर

जळगाव जिल्ह्यात यंदा सुमारे पाच हजार हेक्टरवर कांदा लागवड होणार आहे. त्यात चोपडा तालुक्यातील अडावद व परिसरात सर्वाधिक कांदा लागवड होणार आहे. कांद्यासाठी अडावदचा बाजार व अडावद शिवार सुरुवातीपासून प्रसिद्ध आहे. या भागात जलसाठेही बऱ्यापैकी असल्याने लागवडीला यंदा गती दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com