Wheat Sowing : गव्हाची ३८ हजार ५१४ हेक्टरवर पेरणी

Rabi Sowing : हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत यंदा सिंचनासाठी पुरेसे पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा गहू पेरणीकडे कल आहे.
Wheat Sowing
Wheat Sowing Agrowon
Published on
Updated on

Hingoli News : हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत यंदा सिंचनासाठी पुरेसे पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा गहू पेरणीकडे कल आहे. या दोन जिल्ह्यात शुक्रवार (ता. ६) पर्यंत गव्हाची ३८ हजार ५१४ हेक्टरवर पेरणी झाली होती.

त्यात हिंगोली जिल्ह्यात २० हजार ३३८ हेक्टर (४७.८५ टक्के) आणि परभणी जिल्ह्यात १८ हजार १७६ हेक्टर (४६.२४ टक्के) क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Wheat Sowing
Wheat Sowing : बागायती गव्हाच्या पेरणीचे नियोजन

हिंगोली जिल्ह्यात १ लाख ७६ हजार ८९१ पैकी १ लाख ६२ हजार ४७८ हेक्टरवर (९१.८५ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी २० हजार ३३८ हेक्टर (४७.८५ टक्के), ज्वारीचे सरासरी क्षेत्र ११ हजार ६९७ असताना प्रत्यक्षात १२ हजार ८९६ हेक्टर (११०.२५ टक्के), मक्याची ९७१ पैकी ३८७ हेक्टर (३९.८८ टक्के) पेरणी झाली.

हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख २० हजार १४७ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख २७ हजार ३८२ हेक्टर (१०६.०२ टक्के) पेरणी झाली. करडईचे सरासरी क्षेत्र २०५ हेक्टर असताना प्रत्यक्षात ९५२ हेक्टर (४६२.९२ टक्के) पेरणी झाली.

Wheat Sowing
Wheat Sowing : थंडीमुळे गव्हाची पेरणी वेगात

जवसाची ५.८५ हेक्टर, तिळाची १५ हेक्टर, सूर्यफुलाची ३५१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परभणी जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७९४ पैकी २ लाख ३२ हजार २४२ हेक्टरवर (८५.७६ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी १८ हजार १७६ हेक्टर ४६.२४ टक्के), ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ८५ हजार ३५५ हेक्टर (७५.४८ टक्के), मक्याची २ हजार ८६ पैकी ४५५ हेक्टर पेरणी झाली.

हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार १७० हेक्टर असतांना प्रत्यक्षात १ लाख २७ हजार १६९ हेक्टर (११३.३७ टक्के) पेरणी झाली. करडईची ३ हजार ३७१ पैकी ९२७ हेक्टर (२७.४९ टक्के), जवसाची ११९ पैकी ३२ हेक्टर (२६.८९ टक्के), तिळाची ३३.६४ पैकी १४.४० हेक्टर (४२.८१ टक्के) पेरणी झाली आहे.

हिंगोली-परभणी जिल्हे गहू पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये) स्रोत कृषी विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com